जगातील सर्वात कमी अंतराचे उड्डाण
World’s Shortest Scheduled Flight नवी दिल्ली : विमान प्रवासाचे नाव ऐकताच आपल्या मनात आकाशात उडणाऱ्या लांब पल्ल्याच्या आणि मोठ्या विमानाचे चित्र उभे राहते, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील सर्वात कमी अंतराचे उड्डाण किती दूरचे असू शकते? एक तास किंवा कदाचित काही मिनिटे? जर तुमचे हे उत्तर असे असेल, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. जगात असा एक विमान प्रवास आहे ज्यामध्ये उड्डाणानंतर ८० सेकंदातच (80 Second Flight) ते गंतव्य ठिकाणी उतरते.
आपण स्कॉटलंडच्या (Scotland) ऑर्किनी बेटांवर असलेल्या वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रे बेटांमधील उड्डाणाबद्दल बोलत आहोत. हा प्रवास सामान्य नाही, तर जगातील सर्वात कमी अंतराचे व्यावसायिक उड्डाण म्हणून ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये त्याची नोंद आहे. या प्रवासाचे अंतर फक्त २.७ किलोमीटर (2.7 km) आहे आणि विमानाला ते पूर्ण करण्यासाठी सरासरी फक्त ८० सेकंद (80 Second) लागतात. वाऱ्याची दिशा अनुकूल असताना हा वेळ ५३ सेकंदांपर्यंत कमी होतो.
इतका अल्पकालीन प्रवास विमानाने का?
तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या कमी अंतरासाठी विमान का वापरले जाते? त्याचे कारण म्हणजे या दोन बेटांमध्ये कोणताही रस्ता किंवा पूल नाही. समुद्रही असा आहे की बोटीने प्रवास करणे कठीण होऊ शकते. म्हणूनच, ही हवाई सेवा स्थानिक लोकांसाठी आणि आवश्यक सेवांसाठी (जसे की वैद्यकीय, शैक्षणिक) वापरली जाते.
छोट्या प्रवासासाठी विमानही छोटे
या छोट्या प्रवासासाठी एक छोटेखानी ब्रिटन-नॉर्मन बीएन- २, बी-२६ आयलैंडर विमान वापरले जाते. त्यात सुमारे ८-१० प्रवासी बसू शकतात. प्रवासी बसल्या बसल्या पायलट विमान उडवतानाही पाहू शकतात. त्यामुळे हा अनुभव आणखी खास बनतो. हे अनोखे उड्डाण केवळ स्थानिक लोकांसाठी सोयीचे नाही, तर जगभरातील पर्यटकांना देखील त्याची भुरळ पडली आहे.
Read About : Sandfish : वाळवंटातील वाळूत पोहणारा अनोखा ‘मासा’!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.