हुती बंडखोरांनी घेतली हल्ल्याची जबाबदारी
अदन (येमेन) : Yemen Palace Explosion येमेनमधील आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकारच्या वापरातील राजवाड्याजवळ गुरुवारी (दि. १५) किमान सहा स्फोट झाले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून, अन्य सहा जण जखमी झाल्याची माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने दिली. इराणसमर्थित हुती बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी तातडीने स्वीकारली.
येमेनमधील बंदरनगरी अदन येथे असलेल्या माशिक राजवाड्याच्या परिसरात हा हल्ला झाला. स्फोटांमुळे परिसरात घबराट पसरली आणि नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. येमेन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, हुती बंडखोरांनी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या साहाय्याने हा हल्ला केला. अदनस्थित ‘सबा’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. एका सुरक्षा अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, राजवाड्याजवळील टेकडीवर किमान दोन स्फोट झाले, तर अन्य दोन स्फोट सुरक्षा प्रवेशद्वाराजवळ झाले.
येमेन सरकारमधील अनेक वरिष्ठ नेते देशाबाहेर वास्तव्यास आहेत. अदनमध्ये उपस्थित असलेले सरकारी अधिकारी सुरक्षित असल्याचे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
सौदी अरेबियाला लक्ष्यय केल्याचा दावा
हुती बंडखोरांनी ‘सौदी शत्रू’शी संबंधित लष्करी कारवाईच्या मुख्यालयाला लक्ष्य केल्याचा दावा केला. सौदी अरेबियातील विमानतळे आणि तेलविषयक पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याच्या त्यांच्या धोरणाचा हा भाग असल्याचे सांगण्यात आले.
Read About : Chandigarh Thar Accident : धनासमध्ये थारची दुचाकीला धडक; 2 जण जखमी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.