झाडावर उलटा लटकला उपेंद्र
नवी दिल्ली : Zombie Reddy 2 NXT LVL : अभिनेता उपेंद्र याचा एकदम हटके लूक समोर आला आहे. त्याच्या आगामी ‘झॉम्बी रेड्डी २ एनएक्सटी एलव्हीएल’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. उपेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त हा लूक प्रेक्षकांसमोर आणण्यात आला.
पोस्टरमध्ये उपेंद्र चक्क झाडाच्या फांदीवर उलटा लटकलेला दिसत आहे. त्याच्या हातात एक मोठे शस्त्र आहे. लांब केस आणि रफ लूकमध्ये तो खूपच वेगळा दिसत आहेत. त्याच्या चेहऱ्यावरही जबरदस्त आक्रमक भाव आहेत. पोस्टरच्या मागे घनदाट जंगल दिसते. आजूबाजूला मशाली पेटलेल्या आहेत. काही लोकही दिसत आहेत. त्यामुळे चित्रपटात ॲक्शनसोबतच थरार पाहायला मिळणार असल्याची झलक मिळते.
पोस्टरवर ‘रेडी टू र्टन द वर्ल्ड अपसाइड डाउन’ अशी टॅगलाइन आहे. उपेंद्र याच्या उलट्या लूकला ही टॅगलाइन चांगलीच शोभून दिसते.
तेजा सज्जासोबत शनाया कपूर
या चित्रपटात तेजा सज्जा मुख्य भूमिकेत आहे. अभिनेत्री शनाया कपूर या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. ‘झॉम्बी रेड्डी’चा हा दुसरा भाग आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुपर्ण एस. वर्मा करत आहेत. पहिल्या भागाशी जोडलेले दिग्दर्शक प्रशांत वर्मा हेही या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा हुसेन दलाल, प्रशांत वर्मा आणि सुपर्ण एस. वर्मा यांनी लिहिली आहे. संगीत गौरा हरी यांनी दिले आहे.
सात भाषांमध्ये होणार रिलीज
‘झॉम्बी रेड्डी २ एक्सटी एलव्हीएल’ हा चित्रपट एकाच वेळी सात भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, नेपाळी आणि जपानी भाषेत हा चित्रपट पाहता येणार आहे. मात्र, चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे उपेंद्र यांचा हा भन्नाट अवतार रुपेरी पडद्यावर कधी पाहायला मिळणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
Read About : Sonarika Katrina Trolling : कतरिनाच्या ट्रोलिंगवर सोनारिकाचा पलटवार
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.