कोरपना: तेलंगणातील आदिलाबाद येथून चोरीला गेलेली दुचाकी कोरपना पोलिसांनी वनसडी टोलनाक्याजवळ नाकाबंदीदरम्यान जप्त केली. या प्रकरणी सराईत गुन्हेगार मिलिंद जयभारत डंवरे (३३), रा. लोणी, कोरपना याला ताब्यात घेऊन आदिलाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
७ ऑगस्ट रोजी वाहन तपासणीदरम्यान पोलिसांनी संशयितरीत्या पळून जाणाऱ्या मिलिंदला पकडले. त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र. एपी ०१ एफ ०४७३) आदिलाबाद बसस्थानकातून चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. आरोपीवर पांढरकवडा, राजुरा व गडचांदूर येथे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या पथकाने केली.


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.