दुचाकी चोरी करणाऱ्या दोन विधीसंघर्ष बालकांना अटक

२.२० लाखांच्या ६ सायकली जप्त

भद्रावती: भद्रावती पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २ लाख २० हजार रुपये किंमतीच्या सहा चोरीच्या हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

६ ऑगस्ट रोजी गोपनिय माहितीवरून एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदाराच्या मदतीने भद्रावती व परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.