Ad Advertisement Ad Advertisement

तलवार बाळगून दहशत पसरविणाऱ्या युवकाला अटक

बल्लारपूर: लोकांमध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने विनापरवाना लोखंडी तलवार बाळगणाऱ्या चेतन प्रेमचंद निषाद (१८), रा. टिळक वॉर्ड, बल्लारपूर या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

६ ऑगस्ट रोजी गस्तीदरम्यान, किल्ला वॉर्डातील पेपर मिलच्या पडीक क्वॉर्टरसमोर एक युवक तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चेतनला घेराव घालून ताब्यात घेतले व त्याच्याकडील तलवार जप्त केली. आरोपीविरुद्ध आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक उमेश जोगदंड व पथकाने केली.

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.