गांधीजींच्या तीन माकडांच्या प्रतिकृतीवर हर्षवर्धन सपकाळ यांचा चेहरा लावून अनोख्या पद्धतीने निषेध
आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात संपूर्ण नागपूर शहरात संतापाची लाट !!!
काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याबद्दल केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद विधानाच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नागपूर शहरच्या वतीने व्हेरायटी चौक, सिताबर्डी येथे अत्यंत आक्रमक निषेध आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा. श्री. राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात, शहराध्यक्ष मा. श्री. अनिल अहिरकर यांच्या नेतृत्वात आणि शहराचे कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्या आयोजनात पार पडले.
आंदोलनादरम्यान एका अत्यंत अनोख्या व आक्रमक पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ‘तीन माकडां’च्या प्रतिकृतीवर ‘बुरा मत बोलो’ (वाईट बोलू नका) असा संदेश देत त्यावर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा चेहरा लावण्यात आला होता. आंदोलकांनी संपूर्ण परिसर “हर्षवर्धन सपकाळ मुर्दाबाद” आणि “महिलांचा अपमान सहन करणार नाही” अशा तीव्र घोषणांनी लावून धरला होता.
आंदोलनाचा वाढता आक्रमकपणा आणि कार्यकर्त्यांचा रोष पाहून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांनी मुख्य संयोजक व कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले. मात्र, कार्यकर्त्यांचा निषेधाचा सूर कायम राहिला.
याप्रसंगी बोलताना पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, महिलांविषयी अपमानास्पद भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला शोभणारी बाब नाही. आदरणीय सुनेत्रावहिनींनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र कार्य उभे केले आहे. काँग्रेसकडे विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्यासारखे काही उरलेले नसल्यामुळेच ते अशा खालच्या पातळीच्या वैयक्तिक टीकेवर उतरले आहेत. महिलांचा सन्मान आणि सामाजिक मूल्ये अबाधित राखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव ठामपणे उभी राहील.
या आंदोलनात अनिल अहिरकर, राजाभाऊ टाकसाळे, श्रीकांत शिवणकर, प्रशांत पवार, आभाताई पांडे, बजरंग सिंग परिहार, तानाजी वनवे, राजेश माटे, दिलीप पनकुले, रमेश फुले, जानबा मस्के, सुनीता येरणे, विशाल खांडेकर, माधुरी पालीवाल, नूतन रेवतकर, मनोज सांगोळे, ब्रह्मानंद मस्के, राजेश शुक्ला, दिनेश रोडगे, मुकेश रेवतकर, संदीप सावरकर, खिजर अली, राजू मिश्रा, मोंटी गंडेचा, राजेश समर्थ, नितीन डेंगे, राजेश फुले, राजू नागुलवार, बंटी मुल्ला, श्वेता डोमकुंडवार, राहुल कांबळे, डॉ. मेंढ, विश्वास पक्किडे, जगदीश पंचबुदे, मनीषा शाहू, बिरू सिंग, भूषण हरडे, मुमताज बाजी, शहाजा बाजी, कनिजा बेगम, गोविंदराव सोमकुवर, योगेश चीवांडे, मनीष मसराम, अमरपाल सिंग राजपूत, यशस्वी बनसोड, अंजुम शेख, निसार अली, सत्यम सोडगीर, विवेक वानखेडे, भोला पटेल, कुलवंतसिंग भामरा, रूपाली पिचकाटे, प्रवीण पाटील, अमित पिचकाटे, सुनील विभुते, श्याम बिहारी पांडे, कपिल नारनवरे, तुषार ढबाले, विश्वास सेलसूरकर, राहुल आमदरे, मिलिंद जगताप, रमेश कांबळे, नामदेव देशकर, कमलेश कोटावर, दुर्वेश खडसे यांसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नागपूर शहर
