Ad Advertisement Ad Advertisement

दोन घरफोड्यांचा माजरी पोलिसांकडून पर्दाफाश महिलेसह दोन अल्पवयीन मुले ताब्यात

माजरी : पोलिसांनी घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत २५ वर्षीय महिला सोनू उर्फ सोनी किसन यादव हिला ताब्यात घेतले आहे. तपासात तिच्यासह दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग निष्पन्न झाला असून, पोलिसांनी त्यांच्याकडून ३२ हजार ५०० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.

तक्रारदार तिरुपती बिंगी आणि संगीता यादव यांच्या घरामधून सोन्या-चांदीचे दागिने, तांब्या-पितळेची भांडी आणि टिल्लू पंप चोरीला गेला होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संशयित महिलेला पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुबोध वंजारी व त्यांच्या पथकाने पार पाडली.

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.