Ad Advertisement Ad Advertisement

गोदावरीच्या पुरात विजेचा धक्का; सावखेड्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

ढोरेगाव : गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने मच्छीमारांच्या जीविताला धोका निर्माण झाला असतानाच रविवारी (दि. १६) सावखेडा शिवारात विजेच्या धक्क्याने दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कैलास नंदू पवार (वय ४२) आणि ज्ञानेश्वर नंदू पवार (वय ३८), रा. सावखेडा, अशी मृतांची नावे आहेत.


सावखेडा शिवारातील महानुभाव आश्रमाजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास दोन्ही भाऊ मासेमारीचे जाळे काढण्यासाठी गोदावरीच्या पुराच्या पाण्यात उतरले होते. त्यावेळी अचानक त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. दोघांनाही तातडीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.