पुणे : पुणे-नगर महामार्गावरील शिरूर शहरातील संग्राम हॉटेलसमोर चार वाहनांचा भीषण अपघात झाला. कंटेनर, फोर्ड एन्डेव्हर, दुचाकी आणि एसटी बस यांच्यात झालेल्या या धडकेत दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यातील दृश्ये थरारक असल्याचे समोर आले आहे.
या दुर्घटनेत फोर्ड एन्डेव्हरचा चालक आणि दुचाकीस्वार यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथील उद्योजक किशोर यादव यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.
चार वाहनांच्या या धडकेमुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या अपघातामुळे वाडेगव्हाण आणि शिरूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.