Ad Advertisement Ad Advertisement

26/11 Mumbai Terrorist Attack – दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजुटीने उभा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

मुंबई तसेच पहलगाम हल्ल्यातील शहीद जवान आणि निरपराध नागरिकांना मुख्यमंत्र्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : 26/11 Mumbai Terrorist Attack – 26/11चा हल्ला हा केवळ ताज हॉटेल, ट्रायडेंट किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील हल्ला नव्हता, तर तो भारताच्या सार्वभौमत्वावर आणि संविधानावर केलेला हल्ला होता. कोणताही दहशतवादी मुंबई, महाराष्ट्र आणि भारताचा निर्धार संपवू शकत नाही. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजुटीने उभा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने आयोजित केलेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यातील तसेच पहलगाम येथील शहीद जवान आणि निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी पोलीस कुटुंबांसाठी संघटनेने उपलब्ध करून दिलेल्या सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण केले.

संविधानाप्रती कृतज्ञता

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 26 नोव्हेंबर हा संविधान दिन असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला अर्पण केलेल्या संविधानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्याचबरोबर मुंबईवरील 26/11च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, जवान आणि नागरिकांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचाही हा दिवस आहे.

मुंबई कधीही थांबणार नाही

मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी पोलीस आणि सुरक्षा दलातील जवानांनी अतुलनीय शौर्याने दहशतवाद्यांचा मुकाबला केला. शहीद तुकाराम ओंबळे यांनी प्राणांची पर्वा न करता कसाबला जिवंत पकडल्यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा चेहरा जगासमोर आला. मुंबई तेव्हाही थांबली नाही आणि कधीही थांबणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पहलगाममधील हल्ला मानवतेला काळिमा फासणारा

पहलगाममधील हल्ला मानवतेला काळिमा फासणारा होता. भारताच्या जवानांवर किंवा नागरिकांवर होणारा कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कृतीतून दाखवून दिल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणाला प्राधान्य

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्यावतीने मांडलेले प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक कार्यवाही करेल. पोलीस भरती, प्रशिक्षण, पोलीस पाल्यांचे प्रश्न आणि पोलीस कुटुंबांचे कल्याण यासाठी शासन सातत्याने निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Read About : 19 Dams Dry in Marathwada- मराठवाड्यातील १९ धरणे कोरडीठाक

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.