Ad Advertisement Ad Advertisement

Marathwada crop condition, Marathwada drought situation मराठवाड्यातील पीक परिस्थितीचा अहवाल सोमवारी होणार सादर

महसूल मंत्री बावनकुळे यांचे यंत्रणेला निर्देश; अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पाहणी करण्याची सूचना

Marathwada crop condition, Marathwada drought situation छत्रपती संभाजीनगर : सध्या पावसाने ओढ दिली असल्याने मराठवाडा दुष्काळाच्या उबंरठ्यावर पोहोचला आहे. या दुष्काळजन्य परिस्थिीतीच्या अनुषंगाने मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार यांनी पीक परिस्थितीची पाहणी करुन सोमवारी (दि.१४) अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (दि.१२) यंत्रणेला दिले. बावनकुळे यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला.


विभागीय आयुक्त जी.श्रीकांत तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या आढावा बैठकीत सहभागी झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची पीक पाण्याची तसेच पशुधनाच्या चाऱ्याची नेमकी स्थिती काय आहे, याबाबत वस्तूनिष्ठ माहिती येत्या दोन दिवसात सादर करावी. त्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतांवर जाऊन पाहणी करावी. पीक स्थितीचा आढावा घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

असा झाला मराठवाड्यात पाऊस

बैठकीत छत्रपती संभाजीनगर विभागाची माहिती सादर करण्यात आली की, विभागात सरासरी पर्जन्यमानाच्या ५७.७८ टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षी याच तारखेपर्यंत १०६.३८ टक्के पर्जन्यमान नोंदविण्यात आले होते. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील पर्जन्यमान या प्रमाणे- छत्रपती संभाजीनगर – ८२.३६ टक्के, जालना-८०.०४ टक्के, नांदेड-७४.२३ टक्के, हिंगोली-७०.०८ टक्के, बीड-६४.०५ टक्के, धाराशिव-६२.७३ टक्के, परभणी-५५.३४ टक्के आणि लातूर-५२.१८ टक्के. विभागात एकूण ४९६ मंडळे असून सर्वाधिक २१८ मंडळे हे मध्यम (५० ते ७५ टक्के) पावसाच्या श्रेणीत आहेत.

विभागातील प्रकल्पांमध्ये मोठ्या ११ प्रकल्पात ६६.७४ टक्के जलसाठा

विभागात मध्यम प्रकल्प ७६ असून त्यात २१.३४ टक्के तर लघु प्रकल्प ७८० असून २०.४८ टक्के जलसाठा आहे. विभागात सरासरी ९३ टक्के क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. विभागात असलेल्या ५५.६६ लक्ष जनावरांसाठी १ कोटी ०७ मे.टन चारा साठा उपलब्ध आहे.

पावसाचा खंड २३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर हा दीर्घ म्हणजेच २० दिवसांचा खंड आहे. येत्या दोन दिवसांत पाहणी करुन अहवाल सादर करावा,असे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले.


Comments
Loading comments...