लग्न फक्त ४ महिन्यांतच संपलं
मुंबई: Bigg Boss 20 Gullu divorce : ‘बिग बॉस २०’च्या घरात सध्या स्पर्धकांच्या खेळासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा रंगत आहे. अशातच लोकप्रिय स्पर्धक कुशल तंवर उर्फ गुल्लू याने आपल्या आयुष्यातील एका अत्यंत कठीण प्रसंगाचा खुलासा केला आहे. गुल्लूने आपण २०२४ मध्ये घटस्फोट घेतल्याचे सांगितले असून, त्याचे लग्न अवघे चार ते पाच महिनेच टिकले होते.
‘माझ्यासाठी तो खूपच कठीण काळ होता’
सहस्पर्धक काझी तौकीरसोबत झालेल्या संवादात गुल्लूने आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. लग्नानंतर काही महिन्यांतच नात्यात अडचणी निर्माण झाल्या. नाते वाचवण्यासाठी आपण प्रयत्न केले, मात्र परिस्थिती सुधारली नाही, असे त्याने सांगितले.गुल्लूच्या म्हणण्यानुसार, कुटुंबाच्या अपेक्षेमुळे त्याच्यावर लग्नासाठी दबाव होता. त्यांच्या कुटुंबात लवकर लग्न करण्याची पद्धत असल्याने त्यानेही लग्नाचा निर्णय घेतला. मात्र पुढे हे नाते टिकवणे कठीण झाले.
लग्नाचे फोटो लीक झाले अन वाढला तणाव
गुल्लूने आपल्या घटस्फोटाच्या काळातील आणखी एक धक्कादायक प्रसंग सांगितला. तो ‘रोडीज’च्या चित्रिकरणामध्ये व्यस्त असताना त्याच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले.
‘मी रोडीजच्या टीमसोबत गोव्यात होतो. त्याच वेळी माझ्या लग्नाचे फोटो लीक झाले. मला वाटले की आता माझे सगळे संपले,” अशी भावना गुल्लूने व्यक्त केली.
विशेष म्हणजे, त्याच्या लग्नाचे फोटो यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी गुल्लूने हे फोटो बनावट असल्याचे सांगितले होते. मात्र आता ‘बिग बॉस २०’मध्ये त्याने स्वत: लग्न झाल्याची माहिती दिल्याने या प्रकरणाला पुन्हा चर्चेचे स्वरूप आले आहे.
घटस्फोटाच्या निर्णयाला कुटुंबाचा विरोध
गुल्लूने सांगितले की, घटस्फोटाचा निर्णय घेताना त्याच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला त्याला साथ दिली नाही. उलट, कुटुंब या निर्णयाच्या विरोधात होते. या मतभेदांमुळे काही काळ कुटुंबीय त्याच्यापासून दूरही गेले.
कायदेशीर प्रक्रिया आणि कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागला. या संपूर्ण काळाचा त्याच्यावर मोठा परिणाम झाला.
‘आता फक्त कामावर लक्ष द्यायचं’
या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी गुल्लूने स्वत:ला कामात झोकून देण्याचा निर्णय घेतला. ‘यापेक्षा वाईट काय होणार? आता पुढे आयुष्य नक्कीच चांगले होईल,” असा विचार करून त्याने करिअरवर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले.
गुल्लूचा हा खुलासा ‘बिग बॉस २०’च्या घरातील त्याच्या आयुष्याचा एक वेगळाच पैलू समोर आणणारा ठरला आहे. लग्न, फोटो लीक, कुटुंबाचा विरोध आणि वर्षभराची कायदेशीर प्रक्रिया—या सगळ्याचा सामना करून आता गुल्लू नव्या आयुष्याकडे पाहत आहे.
Read About: Delhi HC Ruling: आधी दिल्लीत राहिले म्हणून Divorce Petition चा अधिकार मिळत नाही; ‘शेवटचे वास्तव्य’ महत्त्वाचे
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.