Phone Overheating : मुंबई : तुमचाही फोन अचानक गरम होतो का?
कधीकधी आपण आडोशाला किंवा सावलीच्या ठिकाणी उभे असलो तरी फोन गरम होऊ लागतो. इतकेच काय, कधीकधी घरात बसलेले असतानाही फोन असा गरम होऊ शकतो. फोन गरम होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्याविषयी माहिती समजून घेऊया.
फोन गरम होण्याची कारणे (Causes)
- एकतर, फोनवर थेट प्रखर सूर्यप्रकाश पडत असेल तर तो गरम होतो. दुसरे, फोनच्या सीपीयू प्रोसेसरवर ताण पडला तरीही फोन गरम होतो.
- फोनवर एकाचवेळी अनेक ॲप्स उघडले असतील, तरी फोन गरम होत असल्याचे लक्षात येईल.
- फोनमध्ये जागा, मेमरी आणि ऊर्जा जास्त प्रमाणात वापरणारे ॲप्स फोन गरम करतात.
- खराब बॅटरी किंवा चार्जिंग केबलमुळेही फोन गरम होऊ शकतो.
- कधी-कधी वायरलेस चार्जिंगमुळेही फोनचे तापमान वाढते
- फोन सतत आणि दीर्घकाळ वापरल्यास बॅटरी गरम होऊ शकते.
- व्हिडीओ स्ट्रिमिंग जास्त वेळ पाहिल्यास फोन गरम होतो.
- फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करताना देखील फोन गरम होऊ शकतो.
- फोनमध्ये मालवेअर किंवा व्हायरस आल्यासही फोन गरम होतो.
फोनचे तापमान कसे मोजायचे?
- आयफोन असो वा अँड्रॉईड, फोनचे तापमान मोजणे अतिशय सोपे आहे. फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन बॅटरी इन्फो या पर्यायावर क्लिक केल्यास ते दिसते.
- पण तुमच्या फोनमध्ये तशी सोय नसेल, तर थर्ड पार्टी ॲप वापरूनही फोनचे तापमान मोजता येते. त्यासाठी सीपीयू-झेड, कूलर मास्टर आणि एआयडीए अशी काही ॲप्स उपलब्ध आहेत. ती फोनच्या तापमानाची माहिती देतात.
- फोनमध्ये दिसणारे तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत असेल तर बाहेरून फोन गरम होणे सामान्य आहे. ते तापमान ३६ ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेले, तरीही घाबरण्याची गरज नाही. पण जर तापमान यापेक्षा जास्त झाले. तर फोन तातडीने थंड करणे गरजेचे आहे.
फोन थंड कसा करावा, काय उपाय (Solutions) करावे?
- फोन थंड करण्याचे किंवा फोनच्े तापमान परत सामान्य पातळीवर येऊ शकेल, असे अनेक उपाय आहेत.
- फोन थंड करण्यासाठी कधीही फ्रीज किंवा फ्रीझरमध्ये ठेवू नये. तापमानात अचानक झालेल्या बदलाने स्क्रीन फुटू शकते.
- सगळे ॲप्स बंद करा, अनेकदा आपण वापरत नसलो तरी खूप अप्स बॅकग्राऊंडला उघडलेले असतात. त्यामुळे फोन गरम होऊ शकतो.
बहुतेक ॲप्स हे उर्जा खाणारे असतात. त्यामुळे फोनच्या प्रोसेसरला गरज नसताना जास्त काम करावे लागते. त्यामुळे तुमच्या फोनचे तापमान वाढले की आधी सगळे ॲप्स बंद करावे.
फोनवर थेट सूर्यप्रकाश पडू देऊ नका
- फोन कधीही थेट ऊन्हात किंवा उष्णतेच्या संपर्कात येऊ देऊ नका. अन्यथा फोन गरम होऊ शकतो.
- बर्फाची खोली किंवा कोल्ड स्टोरेजसारख्या खूप थंड ठिकाणी देखील फोन नेऊ नये.
- फोनचे संरक्षण करण्यासाठी आपण कव्हर लावतो. पण काही वेळा यामुळे उष्णता आत अडकते. जर तुमचा फोन सतत गरम होत असेल, तर हलके आणि हवा खेळती राहील असे कव्हर वापरा.
- सतत वायफाय किंवा ब्लूटुथ चालू ठेवणे फोन गरम होण्याचे एक कारण असू शकते. त्यामुळे थोडा वेळ फोनला एअरप्लेन मोडवर ठेवणे उपयोगी ठरू शकते.
फोनमध्ये अनावश्यक फाईल्स, ॲप्स, आणि डेटा साठलेला असतो. आपण जे ॲप्स वापरत नाही, ते अनइन्स्टॉल करायला हवेत. शिवाय कॅशे आणि नको असलेले फोल्डर आणि फाईल्स डिलीट करायला हव्यात.
Read About : UPI Payment New Rules : यूपीआयने पेट्रोल-डिझेल भरता? 15 ऑक्टोबरनंतर बदलू शकते पेमेंटची पद्धत
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.