२०२२ ते २०२६ या कालावधीत २६ लोकसभा सदस्य, ७ राज्यसभा सदस्य आणि ७८ आमदारांनी पक्ष बदलल्याचा अहवाल
नवी दिल्ली – Political Defection Report लोकसभा, राज्यसभा आणि विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये निवडणूक जिंकल्यानंतर गेल्या चार वर्षांत तब्बल १११ विद्यमान खासदार, आमदारांनी पक्षांतर केले आहे. यामध्ये सर्वात मोठे पक्षांतर नागालँडमध्ये झाले असून, तिथे सर्वाधिक ३२ लोकप्रतिनिधींनी पक्ष बदलला. यानंतर पश्चिम बंगालमध्ये पक्षांतराची प्रकरणे नोंदवली गेली. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ ने २०२२ ते २०२६ या कालावधीसाठी जारी केलेल्या ताज्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
‘एडीआर’ आणि ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ ने पक्षांतर करणाऱ्या या १११ खासदार व आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले आहे. या अहवालानुसार, गेल्या चार वर्षांत २६ लोकसभा सदस्य, ७ राज्यसभा सदस्य आणि ७८ आमदारांनी राजकीय पक्ष बदलले आहेत.
राज्यनिहाय अहवालानुसार, नागालँडमधील ३२ आमदारांनी निवडणूक जिंकल्यानंतर दुसरा पक्ष निवडला आहे. यानंतर पश्चिम बंगालमध्ये २० लोकसभा लोकप्रतिनिधी दुसऱ्या पक्षात सामील झाले आहेत. तेलंगणामध्ये ९ आमदार, गोव्यात ८, मेघालयमध्ये ६, मणिपूरमध्ये ५, अरुणाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी ४, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी २, तर कर्नाटक, मध्य प्रदेश, सिक्कीम आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एका आमदाराने पक्ष बदलला आहे. तसेच, दिल्लीतील राज्यसभेच्या एका सदस्याने आणि महाराष्ट्रातील ६ लोकसभा सदस्यांनी (खासदार) निवडणूक जिंकल्यानंतर दुसऱ्या पक्षाची वाट धरली.
Read About : The Theft of the Western Star : वेस्टर्न स्टारची चोरी !
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.