Ad Advertisement Ad Advertisement

Nashik Crime News : ऑन-ड्यूटी ट्रॅफिक पोलिसाला कारने चिरडण्याचा प्रयत्न; 22 वर्षीय चालक ताब्यात

दत्त मंदिर सिग्नलवर आधी महिला दुचाकीस्वाराला धडक; हवालदाराने प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला

नाशिक : Nashik Crime News : नाशिकच्या गजबजलेल्या दत्त मंदिर सिग्नल परिसरात वाहतूक नियमनाचे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस हवालदाराला कारने चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सिग्नल तोडून भरधाव वेगाने कार चालवताना चालकाने आधी एका महिला दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर कार थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या हवालदाराच्या दिशेने वाहन नेल्याचा आरोप आहे. या घटनेत हवालदाराने प्रसंगावधान राखून बाजूला होत स्वतःचा बचाव केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमका प्रकार काय घडला?

प्राथमिक माहितीनुसार, दत्त मंदिर सिग्नलवर वाहतूक शाखेचे पोलिस वाहतूक नियमनाचे काम करत होते. त्याचवेळी वैभव दांडे (वय २२) याने सिग्नलचे उल्लंघन करून कार पुढे नेल्याचे सांगण्यात येत आहे. सिग्नल ओलांडल्यानंतर काही अंतरावर कारची एका महिला दुचाकीस्वाराला धडक बसली. या घटनेनंतर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस हवालदाराने कारचालकाला थांबण्याचा इशारा केला.

हवालदाराने प्रसंगावधान राखले

पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबवता पुढे नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यावेळी कार हवालदाराच्या दिशेने आल्याचे पाहून त्यांनी तत्काळ बाजूला होत स्वतःचा बचाव केला. या घटनेचा काही भाग नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये कार भरधाव वेगाने जाताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांचा पाठलाग; कारचालक ताब्यात

घटनेनंतर कारचालकाने तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. त्यानंतर उपनगर पोलिसांनी कारचा पाठलाग करून वैभव दांडे याला वाहनासह ताब्यात घेतले. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनगर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Read About : Children Bank Fake Notes : ‘चिल्ड्रन बँक’च्या बनावट नोटांचा बाजारपेठेत धुमाकूळ
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.