हाताचा फोटो अपलोड करून एआयकडून लाइफ लाईन, हार्ट लाईन आणि भविष्यातील शक्यतांचे विश्लेषण; सोशल मीडियावर पाम रीडिंग ट्रेंड व्हायरल
नवी दिल्ली : AI Palm Reading Trend आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात शिरकाव केला आहे. मात्र, हस्तरेषा आणि कुंडली पाहून भविष्य सांगण्यासारख्या पारंपारिक विषयांमध्येही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वापर वेगाने वाढताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर एआयच्या मदतीने स्वत:चे भविष्य जाणून घेण्याचा आणि हाताचे फोटो अपलोड करून ‘पाम रीडिंग’ करण्याचा ट्रेंड तुफान व्हायरल होत आहे.
चॅटजीपीटीच्या नव्या व्हिज्युअल आणि इमेज ॲनालिसिस तंत्रज्ञानामुळे (उदा. इमेजेस २.० / कुंडली जीपीटी) आता लोक आपल्या हाताचा स्पष्ट फोटो अपलोड करून एआयकडून स्वत:ची ‘लाइफ लाईन’, ‘हार्ट लाईन’ आणि भविष्यातील शक्यता विचारत आहेत. एआय फक्त मजकूर न देता, हाताच्या फोटोवरच रेषा आणि खुणा मार्क करून अगदी आकर्षक व्हिज्युअल स्वरूपात मार्गदर्शन/रीडिंग तयार करून देतो. वापरकर्ते एआयला त्यांच्या आवडीनुसार सूचना देतात, जसे की ‘मला एखाद्या कडक गुरूजींसारखे मार्गदर्शन कर’, ‘वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांग’ किंवा ‘मिश्किल भाषेत भाकीत सांग’. एआय अगदी तशाच शैलीत उत्तर देतो.
क्रेझचे कारण काय?
ज्योतिषाकडे न जाता घरी बसल्या एका क्लिकवर, तेही मोफत माहिती उपलब्ध होते. एआयने तयार केलेले आकर्षक डिझाइन लोक पटकन इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि एक्स (ट्विटर) वर मित्रांसोबत शेअर करत आहेत. काही एआय टूल्स केवळ कुंडलीच नाही, तर बाजारातील ट्रेंड्स आणि करिअरच्या संधींचे विश्लेषण करून भविष्यातील मार्ग दर्शवत आहेत. तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मते, एआयही एक पॅटर्न-आधारित यंत्रणा आहे. एआयकडून मिळणारी उत्तरे बऱ्याचदा सर्वसमावेशक असतात. म्हणजेच वाचणाऱ्या कोणालाही ती स्वत:बद्दलच वाटू शकतात (उदा. ‘तुम्ही स्वभावाने प्रामाणिक आहात, पण कधीकधी राग येतो’). त्यामुळे, या भाकितांना केवळ एक मनोरंजन किंवा प्राथमिक कुतूहल म्हणूनच पाहिले पाहिजे. यावर आंधळेपणाने विश्वास ठेवून आयुष्यातील मोठे निर्णय घेणे योग्य ठरणार नाही.
Read About : New Snail Species 2026 – माँटेनिग्रोमध्ये गोगलगाईच्या दोन नव्या प्रजातींचा शोध; कवचाला खास ‘दरवाजा’
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.