Ad Advertisement Ad Advertisement

Greenland Glacier Melting – जहाजांना अशक्य ठरलेल्या समुद्रात नार्व्हल माशांनी उलगडले हिमनग वितळण्याचे रहस्य

सहा नार्व्हल माशांवर बसवलेल्या सेन्सर्समधून खोल समुद्रातील तापमानाची माहिती; अटलांटिक महासागरातील उबदार पाण्यामुळे ग्रीनलँडच्या हिमनगांना धोका

कोपनहेगन (डेन्मार्क) : Greenland Glacier Melting ग्लोबल वॉर्मिंगमुळे उत्तर ध्रुवावरील बर्फ अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वितळत आहे, पण यामागचे नेमके कारण शोधण्यात शास्त्रज्ञांना मोठे अडथळे येत होते. ग्रीनलँडच्या अतिशय धोकादायक आणि बर्फाच्छादित समुद्रात मोठी वैज्ञानिक जहाजे पोहोचणे अशक्य होते. अशा वेळी शास्त्रज्ञांच्या मदतीला आले समुद्रातील युनिकॉर्न समजले जाणारे नार्व्हल मासे. सेन्सर्स लावलेल्या सहा नार्व्हल माशांनी खोल समुद्रात घेतलेल्या डुबक्यांमुळे ग्रीनलँडचे हिमनग वितळण्यामागचे एक मोठे रहस्य उलगडले आहे.

कसे आहेत संशोधन

ग्रीनलँडच्या पश्चिम किनारपट्टीवरील मेलविले उपसागरात राहणाऱ्या स्थानिक शिकाऱ्यांच्या मदतीने वॉशिंग्टन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सहा नार्व्हल माशांच्या पाठीवर सॅटेलाइट ट्रॅकर्स आणि तापमान मोजणारे प्रगत सेन्सर्स बसवले. या माशांनी बर्फाच्या खाली हजारो फूट खोल जात पाण्याचे तापमान मोजले. डेटावरून समोर आले की, अटलांटिक महासागरातील तुलनेने उबदार पाणी थेट ग्रीनलँडच्या किनारपट्टीपर्यंत आणि हिमनगांच्या अगदी खालच्या भागापर्यंत पोहोचत आहे. हे उबदार पाणी हिमनगांना वरून नाही, तर समुद्राच्या आतून म्हणजेच खालच्या बाजूने वेगाने वितळवत आहे, ज्यामुळे बर्फाचे मोठे कडे कोसळत आहेत. नार्व्हल मासे हिवाळ्यात सतत बर्फाखाली राहतात आणि दिवसातून अनेक वेळा हजारो फूट खोल डुबकी मारतात. शास्त्रज्ञांना त्यांच्याकडून हिवाळ्यातील तापमान आणि खोलीचा असा डेटा मिळाला, जो मानवी उपकरणांनी मिळवणे आजवर अशक्य मानले जात होते.

हवामान बदलाचा अंदाज लावणे होणार सोपे

मुख्य संशोधक क्रिस्टिन लेड्रे यांच्या मते, या माशांमुळे मिळालेल्या माहितीमुळे आता जागतिक पातळीवर समुद्राची पातळी किती वेगाने वाढेल, याचा अंदाज लावणे हवामान शास्त्रज्ञांना शक्य होणार आहे.

Read About : NASA GPS-Free Navigation : अंतराळातील कचऱ्याच्या मदतीने नासाचे GPS शिवाय अचूक नेव्हिगेशन; अंतराळ संशोधनात मोठी झेप
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.