भाडे आणि नोकरीचे आमिष; बनावट कागदपत्रे दाखवून विविध शुल्कांच्या नावाखाली नागरिकांकडून उकळले जात पैसे
नवी दिल्ली : Mobile Tower Scam – तुमच्या रिकाम्या जागेत किंवा छतावर ५G मोबाईल टॉवर बसवा, महिन्याला ५० हजार रुपये भाडे मिळवा आणि कुटुंबातील एकाला कायमस्वरूपी नोकरी मिळवा. अशा खोट्या ऑफर्स देऊन सर्वसामान्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हे भामटे फोनवर नक्की कशा प्रकारे बोलून लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात, याचे थेट प्रात्यक्षिक पोलिसांनी प्रसारमाध्यमांसमोर करून दाखवले आहे.
पोलिसांनी काही तरूणींनी अटक केली. फसवणुकीतील तरूणी सर्वसामान्यांना कसे फसवतात. कशा प्रकारसे संवाद साधतात हे सगळे पोलिसांनी प्रात्यक्षिकातून दाखवून दिले. हा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या उपस्थितीत हा डिटेल कॉल पॅटर्न जाहीर केला. या तरूणींचा संवाद ऐकून पोलीसही थक्क झाले आहेत.
लाखोंच्या ॲडव्हान्सचे आणि नोकरीचे आमिष
समोरच्या व्यक्तीला हे लोक रिकामी जागा आहे का याची विचारणा करतात. यासाठी हे भामटे २५ ते ५० लाख रुपये रोख ॲडव्हान्स, दरमहा ३० ते ५० हजार रुपये भाडे आणि घराण्यातील एकाला २० हजार रुपये पगाराची सिक्युरिटी गार्डची नोकरी देण्याचे आमिष दाखवतात.
बनावट कागदपत्रे आणि सरकारी मंजुरी पत्र
विश्वास संपादन करण्यासाठी नागरिकांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जागेचा ७/१२ उतारा व्हॉट्सॲपवर मागवला जातो. काही तासांतच हुबेहूब दिसणारे बनावट मंजुरी पत्र पाठवून जागा फायनल झाल्याचे सांगितले जाते.
विविध शुल्काच्या नावाखाली लुटमार
जागा पास झाल्यानंतर मूळ खेळाला सुरुवात होते. टॉवरचे साहित्य सरकारी गोदामातून सुटण्यासाठी, जीएसटी नोंदणीसाठी आणि एनओसी साठी सुरुवातीला रजिस्ट्रेशन फी भरावी लागेल, असे सांगितले जाते. हा पैसा पुढे पहिल्या भाड्यात परत मिळेल, असे खोटे आश्वासन दिले जाते.
भीती दाखवून वारंवार पैशांची मागणी
एकदा पैसे भरले की, ‘अँटी-रेडिएशन सर्टिफिकेट’ किंवा ‘टॅक्स क्लिअरन्स’च्या नावाखाली २५,००० ते ५०,००० रुपयांची वारंवार मागणी केली जाते. नागरिकांनी पैसे देण्यास नकार दिल्यास, तुम्ही कंपनीचे नुकसान केले असून तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि आधीचे पैसेही जप्त होतील, अशी धमकी फोनवर दिली जाते.
Read About : Marine Drive Police Attack 2026 – ऑन-ड्युटी पोलिस कर्मचाऱ्याशी वाद; हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.