नवे संशोधन : जैव-विघटनशील पॉलिएस्टर प्लास्टिकचेच होऊ शकते विघटन
बर्लिन : Pack-Man enzyme – प्लास्टिक कचरा ही आज जगापुढील सर्वात मोठी आणि गंभीर समस्या बनली आहे. समुद्रात साचत असलेले प्लास्टिक असो किंवा मातीत मिसळणारे सूक्ष्म कण, ते सहजासहजी नष्ट होत नाहीत. पण आता या समस्येवर खुद्द निसर्गानेच एक उपाय शोधून काढला आहे. हा उपाय अद्भूत असला तरी त्यालाही एक मर्यादा आहे. कारण, या उपायात केवळ एलसीएपी (लाँग-चेन अलिफॅटिक पॉलिएस्टर) सारखे जैव-विघटनशील पॉलिएस्टर प्लास्टिक अर्थात बायोप्लास्टिकच नष्ट होऊ शकते, रोजच्या वापरातील नाही. त्यामुळे प्लास्टिक प्रदुषणावर बायोप्लास्टिकचा वापर हाच उपाय सध्यातरी दिसतो आहे.
जर्मनीतील युनव्हिर्सिटी ऑफ कन्स्टांझ येथील वैज्ञानिकांना मातीतील काही सूक्ष्मजीवांमध्ये (बॅक्टेरियामध्ये) एक असे भन्नाट एन्झाइम सापडले आहे, जे बायोप्लास्टिक अगदी चवीने पचवून नष्ट करू शकते. या एन्झाइमचे तोंड उघड्या तोंडासारखे दिसते, म्हणून वैज्ञानिकांनी त्याला गेममधील प्रसद्धि पात्रासारखं पॅक-मॅन एन्झाइम असे मजेशीर नाव दिले आहे. बॅक्टेरिया जैव-प्लास्टिक कसे विघटित करतात, हे समजून घेण्यासाठी संशोधक हॅरी लर्नर आणि डेव्हिड श्लेहेक यांनी वद्यिापीठाच्या वनस्पती उद्यानातील मातीत १० सेंटीमीटर खोल एलसीएपी बायोप्लास्टिकचे तुकडे गाडले. त्याचवेळी प्रयोगशाळेतही त्याच मातीत प्लास्टिकची पावडर मिसळून संपूर्ण वर्षभर निरीक्षण केले. जंगलाच्या मातीत पुरलेले बायोप्लास्टिक २५० ते ३३० दिवसांत पूर्णपणे विघटित झाले. मात्र त्याच काळात प्रयोगात रोजच्या वापरातले एचडीपीईसारख्या पॉलिएथिलीन प्लास्टिकचे जवळजवळ कोणतेही विघटन झाले नाही. त्याच्यावर या जंतूंचा काहीही परिणाम झाला नाही.
इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शकाखाली प्लास्टिकच्या तुकड्यांवर बॅक्टेरियाच्या आकाराची अनेक छिद्रे दिसली. यावरून संशोधकांनी असा अंदाज व्यक्त केला की, बॅक्टेरियाच्या पेशीच्या पृष्ठभागावर असलेली एन्झाइम्स प्लास्टिकमध्ये शिरून ते विघटित करतात. आणखी एक रंजक बाब म्हणजे, हे एन्झाइम पेनिसिलिनसारख्या प्रतिजैविकाची रासायनिक साखळीही तोडू शकते. यामुळे प्लास्टिक विघटन आणि प्रतिजैविक प्रतिकार यांच्यात संभाव्य संबंध असू शकतो. मात्र, प्रयोगशाळेत पेनिसिलिन तुटणे म्हणजेच जिवंत बॅक्टेरियांमध्ये प्रतिजैविक प्रतिकार वाढतो, असे अजून सद्धि झालेले नाही.
पर्यावरणासाठी महत्त्व
संशोधक डेव्हिड श्लेहेक यांच्या मते, जिवाणू पॉलिएस्टर प्लास्टिक विघटित करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जलद अनुकूल होऊ शकतात. पण याचा अर्थ असा नाही की, निसर्गात साचलेले सर्व पारंपरिक प्लास्टिक यामुळे नष्ट होईल. प्लास्टिक प्रदूषण कमी करायचे असेल, तर अशा प्लास्टिकचा वापर वाढवावा लागेल, ज्यांची रासायनिक रचना सूक्ष्मजीवांना विघटित करता येईल. पॅक-मॅन एन्झाइमचा हा शोध भवष्यिातील पर्यावरणपूरक उपायांना महत्त्वाची दिशा देऊ शकतो.
अत्यंत महत्त्वाचा धडा
या संशोधनाने एक अत्यंत महत्त्वाचा धडा दिला आहे तो म्हणजे जिवाणू सर्वच प्रकारचे प्लास्टिक खाऊ शकत नाहीत. शास्त्रज्ञ डेव्हिड श्लेहेक यांच्या मते, प्लास्टिक प्रदूषण खरोखर संपवायचे असेल, तर आपल्याला निसर्गातील या सूक्ष्मजीवांच्या क्षमतेनुसार काम करावे लागेल. जिवाणू सहजासहजी पचवू शकतील अशाच जैव-विघटनशील (बायोप्लास्टिक) उत्पादनांची नर्मितिी वाढवणे हाच या संकटावरचा खरा उपाय आहे.
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.