Ad Advertisement Ad Advertisement

Chhatrapati Sambhajinagar Murder : आधी कारची जोरदार धडक, नंतर रॉडने वार; एन-7 सिडको भागात भरदिवसा व्यावसायिक वादातून मित्राचा क्रूर खून

कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर लोखंडी रॉडने डोक्यावर वार, आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर

छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhajinagar Murder शहरातील एन-७ सिडको भागात एका धक्कादायक आणि थरारक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. व्यावसायिक वादाचे पर्यावसान टोकाच्या वादात होऊन एका तरुणाचा त्याच्याच जवळच्या मित्राने अत्यंत क्रूरपणे काटा काढल्याची घटना मंगेश गॅस एजन्सीसमोर उघडकीस आली आहे. देवेश उर्फ बंटी चंद्रेश दीक्षित (वय36) असे या मृत तरुणाचे नाव असून पवन दिलीप पराशर (वय 22) वानखेडेनगर असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत बंटी हा नेहमीप्रमाणे जिम संपवून आपल्या दुचाकीवरून घरी जात होता. दरम्यान, जुन्या व्यावसायिक वादातून आरोपी पराशर याने बंटीचा कारने पाठलाग सुरू केला. बंटीची दुचाकी एन-७ सिडको परिसरातील मंगेश गॅस एजन्सीजवळ आली असता, मागून येणाऱ्या पराशरने आपल्या कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बंटी हवेत उंच उडून रस्त्यावर जागीच कोसळला, तर त्याची दुचाकी तब्बल १५० फुटांवर असलेल्या विश्वास वाईन शॉपजवळ जाऊन पडली.

धडक दिल्यानंतरही आरोपीचा राग शांत झाला नव्हता. त्याने त्याच चौकातून आपल्या कारचा यू-टर्न घेतला आणि तो पुन्हा रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या बंटीजवळ आला. कारमधून खाली उतरून पराशरने सोबत आणलेल्या दांड्याने आणि लोखंडी रॉडने बंटीच्या डोक्यात सपासप वार केले. या अत्यंत क्रूर आणि भीषण हल्ल्यात बंटीचा जागीच मृत्यू झाला.

हत्येनंतर आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात हजर

Chhatrapati Sambhajinagar Murder बंटीचा खून केल्यानंतर आरोपी पराशर हा आपली कार घेऊन थेट सिडको पोलीस ठाण्यात हजर झाला. भरदिवसा घडलेल्या या थरारक हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि अतुल येरमे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची आणि हत्येमागील नेमक्या कारणांची आरोपी पराशरकडे कसून चौकशी करत आहेत.

Read About : Tiger Shroff Mumbai Car Firing Incident 18 Oct: अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.