Ad Advertisement Ad Advertisement

Koala Sleep : जगातील सगळ्यात झोपाळू प्राणी

नवी दिल्ली : Koala Sleep जगात अनेक प्राणी आहेत यातील एक प्राणी असा आहे जो आपल्या आयुष्याचा बहुतेक वेळ फक्त झोपण्यातच घालवतो. त्याला बघितल्यावर कुंभकर्णाची आठवण होते.

हा प्राणी आहे कोआला

हा एक शाकाहारी आणि अत्यंत गोंडस दिसणारा प्राणी आहे, जो प्रामुख्याने ऑस्ट्रेलियामध्येच आढळतो. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात असलेल्या निलगिरीच्या जंगलांमध्ये कोआलाचे वास्तव्य असते. तो झाडांवरच राहतो आणि निलगिरीची पाने हेच त्याचे मुख्य अन्न आहे. एक कोआला दिवसाला जवळपास एक किलोग्रॅम निलगिरीची पाने खातो.

दिवसाला १८ ते २२ तास झोपून

कोआलाला पाणी न पिणारा प्राणी म्हणूनही ओळखले जाते. कारण तो दिवसातून अगदी नगण्य किंवा जवळपास पाणी पीतच नाही. त्याच्या शरीराला लागणाऱ्या पाण्याची गरज तो खात असलेल्या निलगिरीच्या पानांमधूनच पूर्ण होते. कोआला दिवसाचे १८ ते २२ तास झोपून असतो. म्हणूनच त्याला जगातील सर्वात जास्त झोपणाऱ्या प्राण्यांपैकी एक आणि सर्वात आळशी प्राण्यांपैकी एक मानले जाते. नर कोआलाचे सरासरी आयुष्य १२ आणि मादी कोआलाचे १५ वर्षांपर्यंत असते.

एकटा राहणारा प्राणी

कोआला इतका वेळ का झोपतो, यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. निलगिरीच्या पानांमध्ये पोषक तत्व खूप कमी असतात आणि ती पचायला खूप ऊर्जा लागते. या पानांमधून मिळणारी कमी ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि पचनक्रियेला पुरेसा वेळ देण्यासाठी कोआलाला इतकी जास्त झोप घेणे गरजेचे असते. तो एकटा राहणारा प्राणी आहे आणि दिवसाचा बहुतेक वेळ खाण्यात किंवा झोपण्यातच घालवतो.

Read About : Chukchi People : चुकची लोक
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.