Ad Advertisement Ad Advertisement

Anthropic IPO Employees – अँथ्रोपिकच्या आयपीओमुळे कर्मचाऱ्यांचे नशीब पालटले

९५ टक्क्यांहून अधिक जण कोट्यधीश, सात संस्थापक अब्जाधिश

वॉशिंग्टन : Anthropic IPO Employees – Read About: ‘क्लॉड’ हा एआय चॅटबॉट बनवणाऱ्या अमेरिकन कंपनी अँथ्रोपिकचा आयपीओ शेअर बाजारात आला आणि कर्मचाऱ्यांचे आयुष्यच बदलून गेले. कंपनीचे ९५ टक्क्यांहून अधिक कर्मचारी आता कोट्यधीश तर कंपनीचे सातही संस्थापक अब्जाधीश झाले आहेत. ९५ टक्क्यांहून अधिक जण कोट्यधीश बाजाराच्या अंदाजानुसार, कंपनीच्या सुमारे ५,१०० कर्मचाऱ्यांकडे किमान १० लाख डॉलर (सुमारे ९ कोटी रुपये) किमतीचे शेअर आहेत. म्हणजे दहापैकी नऊहून अधिक कर्मचारी आता ‘डॉलर मिलियनेअर’ आहेत. त्यातील सुमारे २,८०० जणांकडे सुमारे १ कोटी डॉलर (अंदाजे ९० कोटी रुपये) किमतीचे शेअर आहेत.

एका अहवालानुसार, संस्थापक गटात नसलेल्या सुमारे ६०० कर्मचाऱ्यांकडे तर सुमारे १० कोटी डॉलर (अंदाजे ९०० कोटी रुपये) इतकी हिस्सेदारी आहे. मात्र ही संपत्ती केवळ शेअरच्या सध्याच्या भावावर आधारित आहे. कंपनीने आयपीओमध्ये शेअरचा भाव ८३ डॉलर ठरवला होता. बाजारात मात्र त्याची सुरुवात १११.५ डॉलरवर झाली. त्यामुळे आयपीओमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना लिस्टिंगच्या दिवशीच सुमारे ३४ टक्के फायदा झाला.

विक्रमी निधी

अँथ्रोपिकने गुरुवारी आयपीओमधून सुमारे ८१ अब्ज डॉलर उभे केले. यामुळे एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचा विक्रम मोडून सर्वात मोठ्या आयपीओचा मान कंपनीने मिळवला.

अँथ्रोपिक काय करते?

अँथ्रोपिक ही अमेरिकन एआय कंपनी आहे. ओपनएआयच्या सात माजी कर्मचाऱ्यांनी आणि संशोधकांनी जानेवारी २०२१ मध्ये तिची स्थापना केली. डारियो अमोदेई हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. संशोधन आणि व्यवसाय धोरणात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. कंपनी ‘क्लॉड’ हा चॅटबॉट आणि इतर एआय साधने तयार करते. प्रश्नांची उत्तरे मिळवणे, मजकूर लिहिणे, कोडिंग आणि व्यवसायाशी संबंधित कामांसाठी ‘क्लॉड’ वापरला जातो.

Read About: San Francisco AI Supply Chain Declaration : भारत-अमेरिकेसह 10 देशांची एआय सुरक्षेसाठी एकजूट; चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न?
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.