Ad Advertisement Ad Advertisement

Nobel Prize 2026 : रेणूंच्या ‘मिरर इमेज’चे रहस्य उलगडणाऱ्या हेन्री कागन आणि केन्सो सोई यांना रसायनशास्त्राचा नोबेल

दिग्गज शास्त्रज्ञांनी रसायनशास्त्रातील तब्बल १०० वर्षांहून जुने असलेले होमोकिरालिटीचे मोठे रहस्य उलगडले

स्टॉकहोम : Nobel Prize 2026 वर्ष २०२६ चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने यंदाचा हा सर्वोच्च बहुमान फ्रान्सचे हेन्री बी. कागन आणि जपानचे केन्सो सोाई यांना संयुक्तपणे देण्यात आला आहे. त्यांना हा पुरस्कार असममित सेंद्रिय संश्लेषणातील नॉन-लीनियर प्रभाव आणि ऑटो-कॅटालिसिसच्या शोधासाठी देण्यात आला आहे.

या दोन दिग्गज शास्त्रज्ञांनी रसायनशास्त्रातील तब्बल १०० वर्षांहून जुने असलेले होमोकिरालिटीचे मोठे रहस्य उलगडले आहे. कोणत्याही रासायनिक प्रक्रियेत एकाच वेळी दोन प्रकारच्या मिरर इमेज (आरशातील प्रतिमा) सारखे रेणू तयार होत असताना, त्यापैकी फक्त एकच हवा असलेला अचूक रेणू कसा तयार केला जाऊ शकतो, याचे तंत्रज्ञान त्यांनी जगासमोर आणले.

नोबेल समितीच्या सदस्यांनी हे संशोधन सोप्या भाषेत समजावून सांगताना आपल्या हातांचे उदाहरण दिले. आपले दोन्ही हात दिसायला अगदी सारखेच असतात, परंतु डावा हात उजव्या हाताची जागा घेऊ शकत नाही (ते एकमेकांवर तंतोतंत बसत नाहीत). काही रासायनिक रेणूंचे स्वरूपही अगदी असेच असते. जेव्हा प्रयोगशाळेत वैज्ञानिक औषधे किंवा रसायने बनवतात, तेव्हा अनेकदा हे दोन्ही प्रकार एकत्र तयार होतात.

औषध निर्मितीच्या क्षेत्रात ही एक मोठी समस्या होती, कारण एखाद्या औषधाचा एक भाग (मिरर इमेज) आजार बरा करू शकतो, तर त्याचा दुसरा भाग शरीराला गंभीर नुकसान पोहोचवू शकतो. मानवी शरीरातही याचे उदाहरण दिसते; आपले शरीर प्रथिने तयार करण्यासाठी केवळ एकाच प्रकारच्या अ‍ॅमिनो अ‍ॅसिडचा वापर करते.

हेन्री बी. कागन (१९८६): त्यांनी सर्वप्रथम केमिकल रिअ‍ॅक्शन नियंत्रित करण्याची एक नवीन पद्धत शोधली, ज्याच्या मदतीने हव्या असलेल्या मिरर इमेजच्या रेणूंचे प्रमाण वाढवणे शक्य झाले.

केन्सो सोाई (१९९५-२००३): त्यांनी या संशोधनाला पुढे नेले. त्यांनी अशा रासायनिक प्रक्रिया डिझाइन केल्या ज्यामध्ये संभाव्य रूपांपैकी फक्त एकच अचूक रूप तयार होते आणि तेच पुढे स्वतःसारखे आणखी रेणू बनवण्यास मदत करते (ऑटो-कॅटालिसिस).

नोबेल विजेत्यांना आगामी १० डिसेंबर रोजी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे एका भव्य समारंभात सन्मानित केले जाईल. २०२६ मधील नोबेल पुरस्काराची रक्कम १२ दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच सुमारे ११.५ कोटी रुपये इतकी आहे, जी या दोन शास्त्रज्ञांमध्ये समान विभागून दिली जाईल.

नोबेल सप्ताहातील इतर महत्त्वाच्या घोषणा (२०२६)

भौतिकशास्त्र : बेल्जियमचे वैज्ञानिक फ्रांसिस हाल्झेन यांना दक्षिण ध्रुवावरील बर्फात रहस्यमयी न्यूट्रिनो कण पकडण्याच्या शोधासाठी भौतिकशास्त्राचा नोबेल मिळाला आहे.

वैद्यकशास्त्र : कार्ल डीसेरोथ, पीटर हेगेमॅन आणि जॉर्ज नागेल यांना मेंदूच्या पेशी प्रकाशाने नियंत्रित करणाऱ्या ऑप्टोजेनेटिक्स तंत्रज्ञानासाठी वैद्यकशास्त्राचा नोबेल जाहीर झाला आहे.

Read About : Pune First Marriage Mystery : कोर्टात सिद्ध न झालेल्या पहिल्या लग्नाचे गूढ!

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.