फिरोजाबादच्या डीएव्ही मार्केटमध्ये कौटुंबिक वादातून गोळीबार
फिरोजाबाद – Firozabad Firing उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि तिच्या कथित प्रियकरावर भरचौकात गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. कोटला चुंगी परिसरातील डीएवी मार्केटमध्ये हा थरार घडला.या खळबळजनक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आरोपी पती ऋषभ तैलंग (३५) आणि त्याची पत्नी शिप्रा (३२) यांच्यात गेल्या काही काळापासून वाद सुरू होता. दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत असून त्यांच्यात न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण प्रलंबित आहे. मंगळवारी रात्री शिप्रा वकिलाला भेटायला जाते असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र, संशय आल्याने ऋषभ आपल्या दोन मुलांसह तिचा माग काढत कोटला चुंगी परिसरातील एका दुकानापाशी पोहोचला. दुकानाचे शटर आतून बंद होते. ऋषभने आत जाऊन पाहिले असता, त्याची पत्नी शिप्रा आणि तिचा कथित प्रियकर जितेंद्र ठाकूर उर्फ सनी तिथे एकत्र बसून मद्यपान करताना आढळले.
पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पाहताच ऋषभचा पारा चढला. अत्यंत संतापलेल्या ऋषभने त्याच्या परवानाधारक रिवॉल्व्हरमधून त्या दोघांवर थेट ४ ते ५ गोळ्या झाडल्या. या गोळीबारात जितेंद्रच्या छातीत आणि बरगड्यांमध्ये तीन गोळ्या लागल्या, तर शिप्राच्या खांद्यावर आणि पोटावर गंभीर दुखापत झाली. गोळी लागल्यानंतर शिप्राने गंभीर जखमी अवस्थेत दुकानातून पळ काढत शेजाऱ्यांकडे मदत मागितली.
दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ आग्रा येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित पावले उचलत आरोपी पती ऋषभ तैलंग याला घटनास्थळावरूनच अटक केली असून, गुन्ह्यात वापरलेली रिवॉल्व्हर जप्त केली आहे.
Read About : Triple Murder 2026 : देहरादूनमध्ये भरदिवसा तिहेरी हत्याकांड; वृद्ध दांपत्यासह मोलकरणीची हत्या
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.