Ad Advertisement Ad Advertisement

Jensen Huang Reinstated as NVIDIA CEO : जेन्सेन हुआंग यांचे एनव्हिडियामध्ये पुनरागमन; CEO आणि संचालकपदी पुनर्नियुक्ती

११ दिवसांपूर्वी राजीनामा दिलेल्या जेन्सेन हुआंग यांना एनव्हिडियाच्या संचालक मंडळाने पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी दिली; कोलेट क्रेस CFO म्हणून काम पाहणार

नवी दिल्ली : Jensen Huang Reinstated as NVIDIA CEO जगातील आघाडीची एआय चिप निर्माता कंपनी एनव्हिडियाने सोमवारी जेन्सेन हुआंग यांची कंपनीचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि संचालक मंडळाचे सदस्य म्हणून तत्काळ प्रभावाने पुनर्नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा केली. कंपनीच्या संचालक मंडळाने हा निर्णय एकमताने घेतला.

गेल्या काही दिवसांत जेन्सेन हुआंग यांच्यासोबत झालेल्या अनेक बैठका आणि चर्चांनंतर संचालक मंडळाने हा निर्णय घेतल्याचे एनव्हिडियाने एका निवेदनात म्हटले आहे. ”संचालक मंडळाला हुआंग यांच्या पारदर्शकतेवर, नेतृत्वावर आणि कंपनीचे नेतृत्व करण्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. या प्रक्रियेदरम्यान, संचालक मंडळाने अमेरिकेच्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशीही सल्लामसलत केली आणि मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे निष्कर्ष काढला की, हुआंग यांच्या परतण्यामुळे कोणताही राष्ट्रीय सुरक्षेचा धोका निर्माण होत नाही,” असेही कंपनीने त्यात म्हटले आहे.

हुआंग हेच योग्य व्यक्ती ः जोन्स

”कंपनीचे नेतृत्व करण्यासाठी जेन्सेन हुआंग हे सर्वात योग्य व्यक्ती आहेत, असा बोर्डाचा विश्वास आहे आणि त्यांचे परत येणे हे भागधारक, कर्मचारी, भागीदार आणि ग्राहक यांच्या सर्वोत्तम हिताचे आहे,” अशी प्रतिक्रिया एनव्हिडिया बोर्डाचे अध्यक्ष हार्वे सी. जोन्स यांनी दिली. त्यांनी अंतरिम सीईओ म्हणून काम केलेल्या आणि कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) म्हणून काम करत राहणाऱ्या कोलेट क्रेस यांचीही स्तुती केली.

Read About : Niemann-Pick Type C Disease : नीमन-पिक टाईप सी आजारावरील औषधाला अमेरिकन FDA ची मंजुरी

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.