Ad Advertisement Ad Advertisement

Free Foodgrains for Drought-Hit Talukas in Maharashtra – राज्यातील दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांत होणार धान्याचे मोफत वितरण

शासनादेश जारी : प्रत्येक लाभार्थीला मिळणार लाभ, पोर्टेबल सुविधेची अंमलबजावणी

Free Foodgrains for Drought-Hit Talukas in Maharashtra छत्रपती संभाजीनगर : मदत व पुनर्वसन विभागाच्या संदर्भाधीन दि. २५ सप्टेंबर, २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये, राज्यातील जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत पर्जन्याची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये खरीप २०२६ हंगामासाठी प्रथम कळ लागू करून विविध सवलती व उपाययोजना घोषित करण्यात आलेल्या आहेत.

सदर शासन निर्णयातील परिच्छेद २ (९) अन्वये दुष्काळग्रस्त भागातील शेतीवर आश्रित शेतकरी, शेतमजूर इत्यादी घटकांना अन्नधान्याची टंचाई भासू नये, याकरिता प्रभावी व्यवस्था उभी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यादृष्टीने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत केंद्र शासनाने विहित केलेल्या इष्टांकाच्या मर्यादेत गरजू लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वितरित करण्यात येते. यास्तव, संदर्भाधीन दि. २५ सप्टेंबर, २०२६ च्या शासन निर्णयानुसार दुष्काळ जाहीर झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांत अन्नधान्याचा पुरवठा करण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करावी असे शासन आदेशात म्हटले आहे.

असा आहे शासनादेश

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा विनाविलंब व सुरळीतपणे उपलब्ध करण्याकरिता आव डीबीटी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना नियमितपणे देण्यात येईल याची दक्षता घ्यावी.

सन २०२६ च्या खरीप हंगामात दुष्काळ (ट्रिगर -१) जाहीर केलेल्या २६५ तालुक्यांमधील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने, मोफ़त अन्नधान्याची मागणी केल्यास, त्या व्यक्तीचा, संदर्भाधीन अ.क्र.१ येथील दि.१७.१२.२०१३ च्या शासन निर्णयान्वये विहित निकषांनुसार, त्यांच्या उत्पन्नाच्या व उपलब्ध इष्टांकाच्या मर्यादेत, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब प्रवर्गात समावेश करून व शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार सिडिंग पूर्ण करून त्यांना तत्काळ अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यात यावे.

  • दुष्काळ जाहीर झालेल्या २६५ तालुक्यांतून शेतमजूर व नागरिकांचे रोजगार किंवा पाण्यासाठी शहरी, निमशहरी अथवा नजीकच्या तालुक्यांतून शेतमजूर व नागरिकांचे रोजगार किंवा पाण्यासाठी शहरी, निमशहरी अथवा नजीकच्या भागात स्थलांतर होण्याची शक्यता असते. अशा स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या नेमून दिलेल्या रास्तभाव दुकानाव्यतिरिक्त इतर कोणत्याही सोयीच्या रास्तभाव दुकानातून अन्नधान्य उचल करता यावे, यासाठी पोर्टेबल सुविधेची काटेकोर अंमलबजावणी करावी.
  • स्थलांतरामुळे एकही पात्र कुटुंब अथवा लाभार्थी हक्काच्या अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्तिगत दक्षता घ्यावी.मिशन सुधारअंतर्गत त्या-त्या जिल्ह्यातील रद्द झालेल्या शिधापत्रिकांचा इष्टांकदेखील विचारात घेऊन दुष्काळग्रस्त भागातील पात्र लाभधारकांना शिधापत्रिका देण्यात यावी.
  • राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याची उचल व वितरण विहित मुदतीत पूर्ण होण्याच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी आगाऊ नियोजन करावे. तसेच, सदर योजनेंतर्गत अन्नधान्याचा काळाबाजार, अवैध साठेबाजी किंवा गैरव्यवहार होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशी सूचना देखील शासनाने केलेली आहे.

Read About : Firozabad Firing : पतीकडून पत्नी आणि प्रियकरावर गोळीबार; दोघे गंभीर

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.