Ad Advertisement Ad Advertisement

Nepal Flood Damage : महापुरात 1.66 अब्ज डॉलरचे नुकसान; पायाभूत सुविधांना 83 टक्के फटका, जागतिक बँकेचा अहवाल

नेपाळमधील विनाशकारी महापुरामुळे घरे, रस्ते, पूल आणि जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान

काठमांडू : Nepal Flood Damage नेपाळमध्ये २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या विनाशकारी महापुरामुळे मालमत्तेचे सुमारे १.६६ अब्ज (बिलियन) अमेरिकन डॉलर्सचे थेट आर्थिक नुकसान झाले आहे. जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानुसार, या एकूण नुकसानीपैकी तब्बल ८३ टक्के फटका पायाभूत सुविधांना बसला आहे.

जागतिक बँकेचा हा अंदाज नेपाळ सरकारच्या प्राथमिक मूल्यांकनाशी (१.८१ अब्ज डॉलर्स) मिळताजुळता आहे. मात्र, इतर अप्रत्यक्ष घटकांमुळे उद्भवलेले अतिरिक्त नुकसान लक्षात घेता, या आपत्तीचा एकूण आकडा २.७ अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे.

सर्वात जास्त झालेले नुकसान

पायाभूत सुविधा : सर्वाधिक १.३८ अब्ज डॉलर्स (८३ टक्के) नुकसान पायाभूत सुविधांचे झाले आहे. याशिवाय निवासी घरांचे १८५ दशलक्ष डॉलर्स आणि अनिवासी इमारतींचे १०१ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

ऊर्जा क्षेत्र ठप्प : भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांना आलेल्या पुरामुळे जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. एकूण ४३०.७ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प प्रभावित झाले असून, हा नेपाळच्या एकूण स्थापित क्षमतेच्या १०.६ टक्के हिस्सा आहे.

व्यापार मार्ग उद्ध्वस्त : काठमांडूला चीनच्या सीमेशी जोडणाऱ्या ८२ किलोमीटर लांबीच्या रसुवा व्यापार कॉरिडॉरमधील ५५ किमीपेक्षा जास्त रस्ता खराब झाला आहे. तसेच ३७ मोठे पूल आणि ६८ झुलते पूल वाहून गेले किंवा खराब झाले आहेत.

भीषण जीवितहानी : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, या महापुरात १,४५५ लोकांचा मृत्यू झाला असून, ५,२८५ नागरिक अद्यापही बेपत्ता आहे.

जागतिक बँकेच्या मते, मध्य नेपाळमधील रसुवा, नुवाकोट आणि धाडिंग या तीन जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला असून, एकट्या रसुवा जिल्ह्यात ६४ टक्के नुकसान झाले आहे.

Read About : AI Palm Reading Trend 2026- आता थेट एआय कडूनच भविष्य जाणून घेण्याची क्रेझ
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.