Ad Advertisement Ad Advertisement

Why Is Water Sprayed on Coal : कोळसा वाहतूक करतांना त्यावर पाणी का मारले जाते

Why Is Water Sprayed on Coal रांची : वीज निर्मितीपासून ते औद्योगिक क्षेत्रांपर्यंत कोळसा हे एक प्रमुख इंधन म्हणून वापरले जाते. कोळसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी प्रामुख्याने रेल्वे, रस्ता आणि जल मार्गांद्वारे वाहतूक केली जाते. आपण अनेक वेळा कोळसा भरलेल्या मालगाड्या पाहिल्या असतील. पण त्या गाड्यांमध्ये असलेला कोळसा कायम ओला असतो. अनेकदा सोशल मीडियावर तुम्ही याचे व्हिडीओ देखील पाहिले असतील की मालगाडीतील कोळशावर पाणी फवारले जाते. त्यासाठी काही कारणे आहेत त्याविषयी जाणून घेऊया.

धुळीवर नियंत्रण

कोळसा कोरडा असेल तर त्यातून काळी धूळ उडते, ही धूळ श्वासावाटे शरीरात गेल्यास फुफ्फुसांचे आजार निर्माण होऊ शकतात. धूळ पर्यावरण प्रदूषणाचे देखील मोठे कारण ठरते. त्यामुळे कोळशावर पाण्याचा शिडकावा करून ती धूळ खाली बसवली जाते.

आगीचा धोका कमी करणे

कोळसा साठवताना किंवा वाहतूक करताना जर तो गरम झाला, तर त्यात आग लागण्याची शक्यता असते. ऑक्सिडेशनसारख्या रासायनिक प्रक्रियांमधून निर्माण झालेली उष्णता पदार्थाच्या आत साठली, तर त्यामुळे आग लागू शकते. पाण्यामुळे कोळसा थंड राहतो, आणि अशा प्रकारच्या घटनांचा धोका कमी होतो. कोळशाच्या वाहतुकीत पाण्याचा शिडकावा फक्त एक प्रक्रिया नाही, तर ती मानवी आरोग्य आणि औद्योगिक सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाय मानला जातो.

Read About : Why Naval Ships Are Grey : सैन्यांच्या जहाजांसाठी राखाडी रंग महत्वाचा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.