स्वित्झर्लंडमधील ETH झ्युरिचच्या संशोधकांची कामगिरी; जिवंत पेशी आणि कृत्रिम सांगाड्याचा संगम
झ्युरिच (स्वित्झर्लंड) : Bio-Hybrid Robots रोबोटिक्सच्या जगात एका अत्यंत थक्क करणाऱ्या तंत्रज्ञानाचा शोध लागला आहे. स्वित्झर्लंडमधील ईटीएच ज्यूरिच च्या शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटर सिम्युलेशन आणि प्रयोगशाळेत विकसित केलेल्या उंदराच्या स्नायूंच्या पेशींचा वापर करून जिवंत बायो-हायब्रिड रोबोट्स तयार केले आहेत . हे लहान रोबोट्स कोणत्याही मोटर्स किंवा वायरशिवाय, केवळ नैसर्गिक स्नायूंच्या आकुंचनावर उड्या मारू शकतात, पाण्यात पोहू शकतात आणि वस्तू पकडू शकतात.
बायो-हायब्रिड रोबोटिक्सच्या या नव्या तंत्रज्ञानात जिवंत जैविक ऊती आणि मानवनिर्मित सांगाडे एकत्र केले जातात. संशोधकांनी सर्वप्रथम कॉम्प्युटर अल्गोरिदमच्या मदतीने एक मऊ हायड्रोजेल सांगाडा डिझाइन केला आणि तो थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाने अवघ्या एका मिनिटात तयार केला. या सांगाड्यावर उंदराच्या पेशींपासून बनवलेले जिवंत स्नायू जोडण्यात आले. सांगाड्यावरील अत्यंत सूक्ष्म रेघांमुळे स्नायूंचे धागे घट्ट पकडले जातात, ज्यामुळे स्नायूंची शक्ती वाया जात नाही. जेव्हा हे स्नायू आकुंचन पावतात, तेव्हा रोबोटमध्ये मानवी डोळ्यांना स्पष्ट दिसेल एवढी शक्तिशाली हालचाल होते. हे रोबोट्स स्वत:च्या शरीराच्या लांबीच्या तुलनेत एक तृतीयांश उंच उडी मारू शकतात आणि प्रति सेकंद ६.२ मिलिमीटर वेगाने चालू शकतात.
हे रोबोट्स जिवंत पेशींपासून बनलेले असल्याने त्यांच्यात स्वत:ची झीज भरून काढण्याची भूतपूर्व क्षमता आहे. भविष्यात यांचा वापर मानवी शरीराच्या आत अचूक शस्त्रक्रिया करण्यासाठी किंवा निसर्गातील नाजूक पर्यावरणावर लक्ष ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. सध्या हे रोबोट्स जिवंत ठेवण्यासाठी एका विशेष पोषक द्रावणाची गरज भासते, त्यामुळे प्रयोगशाळेबाहेर त्यांचा थेट वापर करण्यासाठी शास्त्रज्ञ आता कृत्रिम रक्तवाहिन्यांचे जाळे विकसित करण्यावर काम करत आहेत.
Read About : Laser Technology for Protein Imaging – लेसर तंत्रज्ञानाने उलगडणार जीवनाचे गुपित!
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.