छत्रपती संभाजीनगरातील एन १ मधील घटना
Scaffolding Collapse in Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : बांधकामाचे लोखंडी मचान (पालक) काढताना अचानक ते कोळल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास एन-१ भागात घडली. या घटनेत मचानवर चढलेला अल्पवयीन मजूर गंभीररित्या जखमी झाला आहे. तर पार्कींगमधील आठ गाड्यांचे नुकसान झाले आहे.
एपीआय कॉर्नर ते गरवाडे स्टेडीयम रस्त्यावरील फिजिक्सवाला क्लासेसच्या बाजुला सम्यक ग्रुपची सुविधी सिग्नेचर ही सात मजली भव्य इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीच्या बाहेरील बाजुचे कलरिंगचे काम करण्यासाठी समोरील आणि डाव्या बाजुने लोखंडी मचान उभे करण्यात आले आहे. कलरिंगचे काम पूर्ण झाल्यामुळे शनिवारी हे मचान काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी दुपारी काही मजूर वरच्या मजल्यावर गेले होते तर एन १२ भागात राहणारा एक अल्पवयीन मजूर समोरील बाजुने मचानवर चढला होता. इमारतीसमोरील पार्कींगमध्ये दोन कार आणि सहा दुचाकी उभ्या केलेल्या होत्या. पहिल्या मजल्यावर चढून मचान काढण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक लोखंडी मचान खाली कोसळले. त्या सोबतच वरच्या मजल्यावर चढलेला अल्पवयीन मजूरही खाली कोसळला. तर लोखंडी ढाचा पार्कींगमध्ये उभ्या केलेल्या गाड्यांवर पडला.
मजुराच्या डोक्याला गंभीर इजा
लोखंडी ढाच्या अंगावर पडल्याने अल्पवयीन मजुराच्या डोक्याला गंभीर इजा झाली. मजूर जखमी झाल्याचे दिसून येताच इतर मजुरांनी त्याकडे धाव घेतली. त्याला तात्काळ रिक्षात टाकून एमजीएम रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती ठिक असून सीटी स्कॅन केल्यानंतर डोक्याला किती इजा झाली हे दिसून येणार असल्याची माहिती रुग्णालयाने दिली. या घटनेची नोंद रुग्णालयात करण्यात आली आहे.
- बघ्यांची जमली गर्दी
या इमारतीच्या समोर काही मजूर ड्रेनेज पाईपलाईन दुरुस्तीचे काम करीत होते. तर क्लासेससमोर काही विद्यार्थी होते. त्यांच्यासमोर ही घटना घडली. काही ढाचा अद्यापही सातव्या मजल्याला लटकेला होता. तो खोली कोसळण्याची भीती होती. - त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी रस्त्यावरील वाहतूक एका बाजुने वळविली. त्यावेळी या ठिकाणी बघ्याची मोठी गर्दी जमा झाली. ती गर्दी बाजुला हटविताना सुरक्षा रक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली. या ठिकाणी क्लासेसचे विद्यार्थी असते तर मोठी हानी झाली असती.
- तसेच मजुराच्या सुरक्षितेची कोणतीही काळजी घेण्यात आली नसल्याचे दिसून येते. घटनेची माहिती मिळताच इमारतीचे मालक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच जखमी मजुराच्या प्रकृतीची विचारणा केली.
- लोखंडी मचानाचा काहीभाग शिल्लक राहून तो हवेत लटकलेला होता. तो कासळ्याची भीती होती. त्यातून पुन्हा काही अप्रिय घडू शकत होते. त्यामुळे काही मजूर वचऱ्या मचल्यावर चढले. त्यांनी शिल्लक राहिलेला भाग दोरीने आवळून वर ओढून घेतला.
Read About : Firozabad Firing : पतीकडून पत्नी आणि प्रियकरावर गोळीबार; दोघे गंभीर
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.