Ad Advertisement Ad Advertisement

knee cartilage regeneration – झिजलेली गुडघ्याची गादीपुन्हा निर्माण करण्यात यश

स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीचे संशोधन

वॉशिंग्टन : knee cartilage regeneration – स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी वाढत्या वयामुळे किंवा दुखापतीमुळे गुडघ्यांमधील झिजलेली गादी (कार्टिलेज) पुन्हा पूर्ववत करण्याचा एक नवा मार्ग शोधून काढला आहे. उंदरांवर केलेल्या यशस्वी प्रयोगांनंतर मानवी टिश्यूवरही याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
वयानुसार सांध्यांमधील ‘१५-पीजीडीएच’ नावाच्या प्रथिनाचे प्रमाण दुप्पट होते, ज्यामुळे कार्टिलेजची झीज होते. या प्रथिनाला रोखणाºया एका औषधाच्या वापरामुळे उंदरांच्या गुडघ्यांमध्ये नवीन आणि गुळगुळीत हायलिन कार्टिलेज तयार झाले. उंदरांवर या औषधाचा प्रयोग केला असता, दुखापतीनंतर होणारा आर्थरायटिस रोखण्यात यश आले. या प्रक्रियेत नवीन स्टेम सेल्सची गरज भासली नाही. त्याऐवजी, कार्टिलेजमधील आधीपासून असलेल्या वृद्ध पेशींनीच आपली जनुक रचना बदलून तरूण पेशींसारखे काम करण्यास सुरुवात केली. गुडघा प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांच्या कार्टिलेज सॅम्पल्सवर या औषधाचा प्रयोग केला असता, एका आठवड्यात मानवी पेशींनीही नवीन कार्टिलेज तयार करण्यास सुरुवात केली.

भविष्यातील फायदा

सध्या ऑस्टियोआर्थरायटिसवर केवळ वेदनाशामक औषधे किंवा शेवटचा पर्याय म्हणून ‘नी रिप्लेसमेंट’ (गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया) उपलब्ध आहे. जर मानवी क्लिनिकल चाचण्यांमध्ये हे औषध यशस्वी ठरले, तर केवळ एका गोळीने किंवा इंजेक्शनने गुडघ्याची गादी पुन्हा तयार करता येईल आणि नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेची गरज भासणार नाही. हे संशोधन प्रसिद्ध नियतकालिक ‘सायन्स’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

Read About : Bhiwandi Harish Gulabjam FDA action – गुलाबजामच्या भांड्यात चक्क उंदीर
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.