Earth oxygen loss : सुपरक्युम्युटरने वर्तवले पृथ्वीवरील सजीवांच्या विनाशाचे भाकीत!
नवी दिल्ली : Earth Oxygen Depletion in the Future पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अंत कसा आणि कधी होणार, याबाबत वर्षानुवर्षे विविध अंदाज वर्तवले जात आहेत. २०२१ मध्ये शास्त्रज्ञांनी एका सुपरक्युम्युटरच्या मदतीने केलेल्या संशोधनात पृथ्वीच्या वातावरणात भविष्यात घडणाऱ्या बदलांचा एक भयानक काळ समोर आणला आहे. या संशोधनानुसार, सुमारे १.०८ अब्ज वर्षांनंतर पृथ्वीवरील ऑक्सिजनयुक्त वातावरण संपुष्टात येऊ शकते आणि हा विनाश अपरिहार्य आहे.
२०२१ मध्ये कझुमी ओझाकी आणि क्रिस्टोफर टी. रेनहार्ड यांनी केलेल्या या संशोधनात, भविष्यातील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी एका स्टोकॅस्टिक मॉडेलचा वापर करण्यात आला होता. सध्याच्या वातावरणातील पातळीच्या १% पेक्षा कमी ऑक्सिजन उरण्यासाठी साधारणपणे १.०८ अब्ज वर्षे लागतील, असा अंदाज या मॉडेलने वर्तवला आहे.
काही ठिकाणी ‘वर्ष १,०००,००२,०२१’ अशी तारीख सांगितली जाते, ती कोणतीही अचूक तारीख नसून पृथ्वीचे वातावरण डीऑक्सिजनेट होण्याचा एक अंदाज आहे.
पृथ्वीवर नेमके काय घडेल?
१. सूर्याचा वाढता प्रकाश : जसा जसा सूर्य अधिक तेजाळ आणि उष्ण होत जाईल, तसतसे पृथ्वीचे हवामान आणि कार्बन चक्रात मोठे बदल घडतील.
२. ऑक्सिजन आणि पाण्याचा नाश : संशोधकांच्या मते, वातावरणातील ऑक्सिजन संपण्याची ही प्रक्रिया पृथ्वीचे पाणी आटण्याआधी आणि ‘मॉइस्ट ग्रीनहाऊस’ स्थिती निर्माण होण्याआधी घडेल. सुरुवातीला ऑक्सिजन संपेल आणि त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बहुतांश पृष्ठभागावरील पाणी नष्ट होईल.
३. सजीवांसाठी जीवघेणे वातावरण : मानवांसह ऑक्सिजनवर अवलंबून असलेल्या सर्व जटिल सजीवांसाठी हा काळ अत्यंत विध्वंसक ठरेल.
दुसरे मोठे संकट
- ऑक्सिजन संपण्याच्या या संकटापूर्वीच पृथ्वीवर आणखी एक मोठे संकट ओढवू शकते, असा इशारा ब्रिटनच्या ब्रिस्टल विद्यापीठाच्या संशोधकांनी दिला आहे:
- लाखो वर्षांत सर्व महाद्वीप एकत्र येऊन ‘पँगेया अल्टिमा’ नावाचा एक नवा महाद्वीप तयार करू शकतात.
- यामुळे पृथ्वीवरील तापमान प्रचंड वाढेल, ज्वालामुखीचा प्रादुर्भाव वाढेल आणि सस्तन प्राण्यांना जगणे कठीण होईल.
- भविष्यात पृथ्वीचे तापमान ४० ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे मानवाचे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे अशक्य होईल आणि वातावरण सजीवांसाठी पूर्णपणे प्रतिकूल बनेल.
Read About : Why Naval Ships Are Grey : सैन्यांच्या जहाजांसाठी राखाडी रंग महत्वाचा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.