पत्नीचे नाव काय होते? संन्यास घेतल्यावर कुटुंबाचे काय झाले?
नवी दिल्ली : Neem Karoli Baba Wife Name उत्तराखंडमधील कैंची धामपासून थेट अमेरिकेपर्यंत लाखो अनुयायी असलेले जगप्रसिद्ध आध्यात्मिक गुरू नीम करोली बाबा यांच्याबद्दल आजही अनेकांच्या मनात अनेक कुतूहूल निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यांचे विचार, चमत्कार आणि भक्तांच्या कहाण्या जगभर प्रसिद्ध आहेत, परंतु त्यांच्या वैयक्तिक आणि सांसारिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
नीम करोली बाबांचा जन्म उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील अकबरपूर गावात झाला होता. त्यांचे मूळ नाव लक्ष्मण दास शर्मा असे होते. त्यांना लहानपणापासूनच धार्मिक गोष्टींची आवड होती. त्या काळातील प्रथेनुसार वयाच्या अवघ्या ११ ते १२ व्या वर्षी त्यांचा विवाह झाला होता. मात्र, वयाच्या विशीतच त्यांनी संन्यास घेतला आणि ते अध्यात्मिक मार्गावर निघाले. त्यांनी आपले वैवाहिक जीवन कधीही लपवले नाही.
पत्नीचे नाव आणि साधी जीवनशैली
नीम करोली बाबांच्या पत्नीचे नाव राम बेटी देवी असे होते. त्या उत्तर प्रदेशातील एका ब्राह्मण कुटुंबातील होत्या. बाबांच्या आध्यात्मिक ख्यातीनंतरही राम बेटी देवी नेहमी प्रसिद्धीच्या झोतातून दूर राहिल्या. त्या कधीही आश्रमाच्या व्यवस्थापनात किंवा सार्वजनिक कार्यक्रमात दिसल्या नाहीत. गावातील लोकांच्या मते, त्या अत्यंत साधे जीवन जगल्या.
संन्यास घेतल्यानंतर कुटुंबाचे काय झाले?
लक्ष्मण दास यांनी घर सोडल्यानंतर आणि देशविदेशात ‘नीम करोली बाबा’ म्हणून प्रसिद्ध झाल्यानंतर, त्यांच्या पत्नी राम बेटी देवी यांनी संपूर्ण कुटुंबाची आणि घराची जबाबदारी एकटीने सांभाळली. अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतो की, संन्यास घेतल्यावर बाबांनी आपल्या कुटुंबाशी कधी संपर्क ठेवला का? मिळालेल्या माहितीनुसार, नीम करोली बाबा अनेकदा त्यांच्या मूळ गावी (अकबरपूर) जायचे. ते आपल्या कुटुंबाला आणि पत्नीला भेटायचे, परंतु त्यांचा बहुतांश वेळ आध्यात्मिक साधना, तीर्थयात्रा आणि भक्तांच्या कल्याणातच जात असे.
Read About : Why Naval Ships Are Grey : सैन्यांच्या जहाजांसाठी राखाडी रंग महत्वाचा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.