अँथ्रॉपिकच्या क्लाऊड एआयने अन्न ॲलर्जीशी संबंधित IgE प्रथिनाला लक्ष्य करणाऱ्या अँटीबॉडी डिझाइन्स तयार केल्या
नवी दिल्ली : Claude AI Drug Discovery कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील नामांकित कंपनी अँथ्रॉपिकने वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या क्लाऊड या एआय मॉडेलने अवघ्या एका महिन्यात अन्न ॲलर्जीवर उपचार करण्यासाठी तब्बल ३५,००० प्रतिपिंडांची (अँटीबॉडी) डिझाइन तयार करून दिल्या आहेत.
अँथ्रॉपिकने केवळ औषधांच्या रेणूंचे डिझाइन करण्यावर भर न देता, औषध निर्मिती, उत्पादन आणि वैद्यकीय चाचण्यांपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात एआयचा वापर वाढवण्यास सुरुवात केली आहे. शरीरात ॲलर्जी निर्माण करणाऱ्या ‘इम्युनोग्लोब्युलिन ई’ (आयजीई) या घटकाला थेट पेशींमधून काढून टाकण्यासाठी हे संशोधन सुरू आहे. Claude AI Drug Discovery
क्लाऊड एआयने तयार केलेल्या ३५,००० डिझाइनपैकी ३ या आयजीईशी घट्ट जोडल्या गेल्या, तर २० डिझाइन या पेशींमधून आयजीईला बाहेर काढण्यास सक्षम आढळल्या. विशेष म्हणजे, यातील ३ डिझाइन सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या पारंपरिक औषधांपेक्षाही अधिक प्रभावी ठरल्या आहेत. Claude AI Drug Discovery
कॅन्सरवरील उपचारात मोठे यश
Claude AI Drug Discovery एका अन्य प्रकल्पात, ‘जनरेट बायोमेडिसिन्स’ या कंपनीला ‘सीएआर टी सेल’ थेरपीमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनुवांशिक सूचनांची एक संक्षिप्त आवृत्ती तयार करण्यासाठी क्लाऊडने मदत केली. त्याचा वापर कॅन्सरच्या ट्यूमरवर करता यावा यासाठी संशोधन सुरू आहे. ट्युमर/गाठींवरील ‘सीएआर टी सेल’ थेरपीसाठी लागणाऱ्या जनुकीय सूचना एआयच्या मदतीने ७० टक्क्यांनी लहान करण्यात आल्या. यामुळे रोगप्रतिकारक पेशींनी प्रयोगात १० पट जास्त रिसेप्टर्स तयार केले आणि कॅन्सरच्या पेशींना अधिक प्रभावीपणे नष्ट केले.
औषध निर्मिती तपासणीत ८९% वेळेची बचत
क्लाऊड एआयने १०६१ पानांच्या अहवालाचे विश्लेषण करून मानवी निरीक्षकांनी शोधलेल्या सर्व ११ चुका शोधल्याच, शिवाय अतिरिक्त ७ नव्या चुकाही उघडकीस आणल्या. यामुळे माणसांचा २५ तासांचा तपासणीचा वेळ घटून ३ तासांपेक्षा कमी झाला.
पुढील वाटचाल आणि संशोधन
अँथ्रॉपिकने ‘ब्रिस्टल मायर्स स्क्विब’ या कंपनीसोबत वैद्यकीय चाचण्यांचे यश मोजण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय ‘मस्क्युलर डिस्ट्रॉफी’सारख्या लहान मुलांमधील दुर्मिळ आजारांवर स्वत:चे संशोधन सुरू केले आहे. हे सर्व संशोधन सध्या प्रयोगाच्या टप्प्यावर असून, या औषधांची मानवी चाचणी सुरू होणे अजून बाकी आहे.
Read About: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे उच्चांकी वीजमागणीत दिलासा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.