सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश प्रमुख पाहुणे
छत्रपती संभाजीनगर: Maharashtra National Law University Convocation – महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचा पाचवा दीक्षांत समारंभ १ नोव्हेंबरला सकाळी १०.३० वाजता कांचनवाडी येथील विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात विविध अभ्यासक्रमांतील एकूण १७१ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करून त्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात येणार आहे.
या दीक्षांत समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा विद्यापीठाचे कुलपती प्रसन्ना बी. वराळे समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तथा विद्यापीठाचे प्र-कुलपती महेश चंद्र त्रिपाठी, कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तथा विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेचे सदस्य रवींद्र के. घुगे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य संतोष जी. चपळगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. बिंदू रोनॉल्ड, कुलसचिव डॉ. धनाजी जाधव यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापकवर्ग उपस्थित राहणार आहे.
या दीक्षांत समारंभात बी.ए. एलएल.बी. (ऑनर्स) अभ्यासक्रमाच्या ४५, बी.बी.ए. एलएल.बी. (ऑनर्स झ्र लॉ ऑफ मॅनेजमेंट) अभ्यासक्रमाच्या ३, एलएल.एम. अभ्यासक्रमाच्या ११४ आणि पीएच.डी.च्या ९ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन स्तरावरील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या या पाचव्या दीक्षांत समारंभाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव होणार आहे. या समारंभासाठी सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. निवृत्ती गाजभारे यांनी केले आहे.
Read About : Teachers Diwali Holidays Extended – शिक्षकांच्या दिवाळीच्या सुट्या 21 नोव्हेंबरपर्यंत वाढल्या
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.