ठाणे, सातारा, सोलापूर, सांगली, बीडसह अनेक जिल्ह्यांतील न्यायालयांना धमकीचे ईमेल; न्यायालये रिकामी करून बॉम्ब शोधक पथकांकडून तपासणी सुरू
मुंबई : Bomb Threat Email Maharashtra राज्यातील ठाणे, सातारा, सोलापूर, सांगली, बीड, हिंगोली, परभणी आणि अमरावतीसह ८ हून अधिक जिल्हा व सत्र न्यायालयांना एकाच वेळी बॉम्बने उडवून देण्याचे धमकीचे ईमेल प्राप्त झाले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी अशा प्रकारे धमक्या मिळाल्याने संपूर्ण राज्यभरातील न्यायालय परिसरात आणि शासकीय यंत्रणेत प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी न्यायालयांच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून काही ठिकाणी खरबरदारी म्हणून न्याायलयातून वकील आणि पक्षकारांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे.
न्यायालयीन इमारती तातडीने केल्या रिकाम्या
संबंधित जिल्हा व सत्र न्यायालयांमधील वरिष्ठ न्यायाधीशांच्या निदर्शनास हा ईमेल येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता स्थानिक पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले. खबरदारीचा उपाय म्हणून काही ठिकाणी तात्काळ न्यायालयीन कामकाज थांबवण्यात आले. इमारतींमधील न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि उपस्थित पक्षकारांना तातडीने बाहेर आणण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अनेक न्यायालयांच्या आवारात वकील आणि नागरिकांची आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र घटनेचे गांभीर्य कळाल्यानंतर वकील बाहेर गेले.
सुरक्षा यंत्रणा अलर्ट; कसून झाडाझडती सुरू
घटनेचे गांभीर्य ओळखून सर्वच संबंधित जिल्ह्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांच्या मदतीला श्वान पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकांद्वारे न्यायालयातील न्यायाधीशांचे चेंबर, विविध दालने यांची कसून तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.
सायबर पोलिसांकडून ईमेलच्या स्रोताचा तपास
एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विविध जिल्हा न्यायालयांना लक्ष्य करून पाठवलेल्या या ईमेल्सची सायबर सेलने गंभीर दखल घेतली आहे. हे ईमेल नेमके कुठून पाठवले गेले, यामागे कोणत्या असामाजिक तत्त्वांचा किंवा टोळीचा हात आहे का, याचा तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, यातील काही ईमेलचा स्रोत परदेशात (कॅनडा) असण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलीस अधिकृत तपास करत आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सर्व न्यायालय परिसरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
Read About : Hingoli credit society fraud हिंगोलीत पतसंस्थेत 1.69 कोटी रुपयांची फसवणूक
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.