अजिंठा डोंगरावर विनाशकारी घाव : आ. अंबादास दानवे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Naigaon hydropower project छत्रपती संभाजीनगर : अजिंठा डोंगररांगेत २००० मेवॅ. क्षमतेचा, १० हजार कोटींची गुंतवणूक प्रस्तावित नायगाव जलविद्युत प्रकल्प पर्यारणासाठी हानीकारक असून याबाबत पुण्यनगरीने विशेष वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत हा प्रकल्प तत्काळ रद्द करण्याची मागणी शिवसेनेचे (यूबीटी) आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
आ.दानवे यांनी पत्रात म्हटले आहे, की ग्रीन वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंठा डोंगरात प्रस्तावित नायगाव जलविद्युत प्रकल्पासाठी एक लाखावर झाडे तोडली जाण्याची शक्यता आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे, की प्रकल्प क्षेत्रात वृक्षमोजणी सुरू आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या तोडणीमुळे पर्यावरणाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होईल. ही हानी प्रतिवृक्षरोपणाने पूर्ण करणे शक्य नाही. २०२१ मध्ये तत्कालीन वनअधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे, की डोंगररांगेत वन्यप्राण्यांचा मुक्त अधिवास आणि संचारमार्ग आहे.
तसेच वाघाचा संचारमार्गही या परिसरात आहे. तसेच प्रस्तावित प्रकल्पापासून केवळ ७-८ किमी. हवाई अंतरात गौताळा अभयारण्य असल्याने हा परिसर पूर्णपणे प्रकल्पमुक्त असणे गरजेचे आहे. तथापि, उपवनसंरक्षक कार्यालयाने या प्रकल्पाला नॉट रिकमंडेड (प्रकल्प उभारण्यास शिफारस नामंजूर) असा अभिप्राय दिला आहे.
निसर्गाचे रक्षण करणे काळाची गरज
या प्रकल्पामुळे वन्यप्राण्यांचे अधिवास व संचारमार्ग नष्ट होऊन मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची व परिसंस्थेचा समतोल बिघडण्याची दाट शक्यता आहे. निसर्गाचे रक्षण करणे काळाची गरज आहे. अशावेळी मराठवाड्याच्या फुप्फुसासमान असलेल्या अजिंठा डोंगररांगेची आणि तेथील समृद्ध वनसंपदेचा नाश करणारा हा प्रकल्प राज्याच्या हिताचा नाही. तरी आपण या प्रकरणात लक्ष घालून हा प्रकल्प तत्काळ रद्द करावा अशी मागणी आ.दानवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Three massive black holes – विश्वाच्या बालपणीची तीन कृष्णविवरे सापडली
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.