Ad Advertisement Ad Advertisement

Jio Platforms Stock Market Debut- जिओ प्लॅटफॉर्म्सची शेअर बाजारात जोरदार धडक

देशातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी ठरली

Jio Platforms Stock Market Debut : मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल सेवा कंपनी ‘जिओ प्लॅटफॉर्म्स’च्या शेअरने बुधवारी शेअर बाजारात तुफान पदार्पण केले. कंपनीचा शेअर आपल्या १,११९ रुपयांच्या इश्यू प्राईसच्या तुलनेत तब्बल २३ टक्क्यांनी उसळला. या धडाकेबाज कामगिरीसह बाजार भांडवलाच्या बाबतीत जिओ प्लॅटफॉर्म्स ही रिलायन्स इंडस्ट्रीजनंतर देशातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे.

संपूर्ण अंबानी परिवार या व्यावसायिक पण भावुक सोहळ्यासाठी उपस्थित होता. कंपनीच्या ३०,२१३ कोटी रुपयांच्या या ऐतिहासिक आयपीओला २४ पट बोली मिळाली होती. यामध्ये अँकर गुंतवणूकदारांसह तब्बल ७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मागणी नोंदवली गेली आणि १.३९ कोटींहून अधिक अर्ज प्राप्त झाले, जो एक जागतिक विक्रम मानला जात आहे. आयपीओच्या पहिल्याच दिवशी अवघ्या १०० मिनिटांत हा इश्यू पूर्ण सबस्क्राइब झाला होता. या अभूतपूर्व प्रतिसादानंतर झालेल्या दणकेबाज लिस्टिंगमुळे गुंतवणूकदारांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे.

बाजार भांडवल १२,५०,५८६.३९ कोटी रुपयांवर

बीएसई आणि एनएसईवर १,११९ रुपयांच्या इश्यू प्राईसच्या तुलनेत कंपनीचा शेअर २१.३६ टक्क्यांच्या वाढीसह १,३५८ रुपयांवर खुला झाला. व्यवहार सुरू होताच बीएसईवर जिओ प्लॅटफॉर्म्सचे एकूण बाजारमूल्य तब्बल १२,५०,५८६.३९ कोटी रुपयांवर पोहोचले. बाजार मूल्यांकनाच्या शर्यतीत जिओ प्लॅटफॉर्म्सने भारती एअरटेल, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेला मागे टाकले आहे. सध्या १५.९४ लाख कोटी रुपयांच्या एम-कॅपसह रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

मुकेश अंबानी झाले भावुक, डोळे पाणावले

जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेडचे शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याच्या प्रसंगी आपली तिन्ही मुले – आकाश, ईशा आणि अनंत यांना मंचावर पाहून उद्योगपती मुकेश अंबानी भावुक झाले आणि त्यांचे डोळे पाणावले. या भावुक करणाऱ्या क्षणी देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक साम्राज्यांपैकी एकाची धुरा सांभाळण्यासाठी पुढच्या पिढीची तयारी झाल्याचे दिसून आले. मुकेश अंबानी आपल्या पत्नी नीता अंबानी यांच्यासह राष्ट्रीय शेअर बाजारात या सोहळ्यासाठी उपस्थित होते.

यादरम्यान आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांनी आपले वडील मुकेश अंबानी यांच्या योगदानाची आठवण काढली आणि त्यांचे आजोबा धीरूभाई अंबानी यांना आदरांजली वाहिल्यानंतर कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला. मुलांनी जिओच्या प्रवासामागील त्याग, महत्त्वाकांक्षा आणि जबाबदाऱ्यांचा उल्लेख केला, तेव्हा मुकेश अंबानी भावुक झाले आणि वारंवार डोळ्यातले अश्रू पुसताना दिसले.

अंतिम टप्पा नसून ती केवळ सुरुवात

रिलायन्स जिओचे अध्यक्ष आणि जिओ प्लॅटफॉर्म्सचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अंबानी यांनी आज कंपनीचे बाजारात सूचीबद्ध होणे हा अंतिम टप्पा नसून ती केवळ सुरुवात आहे, असे सांगितले. त्याच बरोबर त्यांनी मूळ रिलायन्स कंपनीच्या कामगिरीचा उल्लेख करत दशकानुदशके भागधारकांसाठी मूल्य निर्माण करत राहण्याचे वचन दिले.

Read About : Jio Platforms IPO- जिओच्या आयपीओने इतिहास रचला 2026

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.