मनपाची विशेष स्वच्छता व वस्तू संकलन मोहीम : पुनर्वापरावर भर
छत्रपती संभाजीनगर : Donate Unused Items : दिवाळीनिमित्त महिलावर्गाकडून घराची सफाई केली जाते, सफाई करताना माळ्यावर, अडगळतील वस्तू, साहित्य बाहेर काढले जाते, अनेक वस्तू भंगारात विकल्या जातात, तर भंगारात न जाणाऱ्या वस्तू फेकून दिल्या जातात. हि बाब लक्षात घेत आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाने विशेषस्वच्छता व वस्तू संकलन मोहिम सुरू केली आहे. शहरवासियांकडून अशा वस्तू संकलित करून गरजूंना वाटप करण्याचे, तसेच पुनर्वापराच्यादृष्टिने तयार केले जात आहेत.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त ठेवण्यासाठी आयुक्त येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात येत आहे. शहरातील सर्व २९ प्रभागांमध्ये नागरिकांच्या घरातून निघणारे जुने कपडे, चप्पल-बूट, जुने फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडी व इतर वापरण्यायोग्य साहित्य संकलित करण्यासाठी स्वतंत्र वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छता कर्मचारी ही वाहने घेऊन वसाहतींमध्ये जावून नागरिकांना आवाहन करत आहेत. नागरिकांकडूनही त्यांना प्रतिसाद मिळत आहे. व्यावसायिक भागांमध्ये नियमित स्वच्छतेसोबतच संध्याकाळच्या वेळेत अतिरिक्त कचरा संकलन वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठा व व्यावसायिक भागांमध्ये रात्री ११ ते २ या वेळेत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. संकलित वस्तू, साहित्यांपैकी वापरण्यायोग्य वस्तू गरजू नागरिकांना वितरित करण्यात येत आहेत. काही साहित्य सेवाभावी संस्था व सामाजिक संस्थांनाही देण्यात येणार आहे. स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त छत्रपती संभाजीनगरसाठी महानगरपालिकेच्या या विशेष मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही उपायुक्त भोंबे यांनी केले आहे. Donate Unused Items
आरआरआर केंद्रावर केली जाते प्रक्रिया
महापालिकेने जुन्या, विनावापराच्या वस्तू दुरुस्त करून पुन्हा वापरा योग्य बनविणे, किंवा जुन्या व निरुपयोगी वस्तूंपासून नवीन वस्तू तयार करणे, आदींसाठी विविध ठिकाणी प्रक्रिया केंद्र सुरू केलेली आहेत. या केंद्रांना ट्रिपल आर (रिड्यूस, रियूज, रिसाइकल) म्हटले जाते. या मोहिमेत संकलित करण्यात आलेले साहित्य संबंधित प्रभागातील ट्रिपल आर केंद्रांवर पोहोचवले जात आहे. या केंद्रावरच ‘माणुसकीची भिंत’ साकारण्यात आली आहे, याठिकाणी चांगल्या व वापरण्यायोग्य कपडे ठेवले जातात, गरजू नागरिक याठिकाणाहून त्या नेऊ शकतात, सेवाभावी संस्थामार्फत फाटलेल्या कपड्यावर रियूज आणि रिसाइकल प्रक्रिया केली जाते. त्यामुळे कचरा डेपोत प्रक्रियेसाठी जाणारा कचरा कमी होतो, तसेच नवीन स्वरुप दिल्याने वस्तूंचा आयुष्यकाळ वाढतो, तसेच नवीन वस्तूंची मागणी कमी होण्यास मदत होते., असे उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांनी सांगितले. Donate Unused Items
Read About : Husband Suicide After Wife Affair – पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची सासरवाडीतच आत्महत्या
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.