Ad Advertisement Ad Advertisement

Husband Suicide After Wife Affair – पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची सासरवाडीतच आत्महत्या

परपुरुषासोबतचे चॅटिंग पकडले म्हणून देत होते त्रास : पत्नी, सासू-सासरे अन् ठेकेदार पिता-पुत्रांसह ९ जणांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : Husband Suicide After Wife Affair परपुरुषासोबत सुरू असलेले पत्नीचे मोबाईल चॅटिंग पकडल्याच्या कारणावरून पत्नी, सासरच्या लोकांनी केलेल्या छळाला कंटाळून ३३ वर्षीय पतीने सासरवाडीतच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गोलवाडी येथे घडली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात पत्नी, सासू-सासरे आणि ठेकेदार पिता-पुत्रांसह नऊ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मदन गंगाधर घुगे (३३, मूळ रा. अंतरवली खांडी, ता. पैठण, ह.मु. गोलवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे तर, पत्नी मनिषा मदन घुगे, सासू राहीबाई कडुबा जायभाये, सासरे कडुबा जायभाये, आजे सासरे तुळशीराम सोसे, मामे सासरे नाना तुळशीराम सोसे, मामे सासू कमल नाना सोसे (सर्व रा. गोलवाडी) यांच्यासह ठेकेदार संतोष रामभाऊ वाघचौरे, कार्तिक संतोष वाघचौरे आणि मयुर संतोष वाघचौरे (तिघे रा. कोकणवाडी, गणपती मंदिराजवळ, स्टेशन रोड), अशी आरोपींची नावे आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.
मृत मदनची आई चंद्रकला गंगाधर घुगे (५३) या फिर्यादी आहेत. मदन हा सासरवाडीत गोलवाडी येथे राहून सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नी मनिषा आणि योगेश आघाव (रा. सहस्त्रमुळी) यांचे मोबाईलवरील चॅटिंग पकडले होते. तेव्हापासून पत्नी व सासरच्या मंडळींनी त्याचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. तसेच ठेकेदार संतोष वाघचौरे व त्याच्या दोन मुलांनीही ‘तू बायकोकडे यायचे नाही, तिच्यासोबत राहू नकोस, इकडे आलास तर तुला सोडणार नाही’, अशी धमकी देत मदनचा छळ केला. धक्कादायक म्हणजे, ठेकेदाराचा नेमका काय संबंध हे मात्र समजू शकले नाही. अधिक तपास उपनिरीक्षक दिलीप बचटे करत आहेत.

मृतदेह घाटीत सोडून सासऱ्याचे पलायन

१८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मदनने भानुदासनगर येथील बहीण बालिका ढाकणे हिच्या घरी जाऊन आई व बहिणीसमोर आपली कैफियत मांडली. सासरच्या लोकांच्या शिवीगाळ व मारहाणीला मी वैतागलो आहे, असे त्याने सांगितले होते. आई व बहिणीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो तिथून निघून गेला आणि दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याने गोलवाडी येथे झाडाला गळफास घेतला. घटनेनंतर आई व बहिणीने घाटी रुग्णालयात धाव घेतली असता, मदनच्या मृतदेहाजवळ कोणीही नव्हते; तर तिथे असलेला सासरा कडुबा जायभाये त्यांना पाहताच पळून गेला.

Read About : Pregnant Woman Suicide – सहा महिन्यांच्या गर्भवतीची गच्चीवरून उडी मारून आत्महत्या
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.