तरुणांमध्ये उत्साह, भावनिक स्थैर्य आणि संकटांचा सामना करण्याची क्षमता कमी; आर्थिक अस्थिरता, रोजगाराची चिंता आणि AI मुळे वाढणाऱ्या आव्हानांकडे संशोधकांचा इशारा
नवी दिल्ली : Youth Mental Health Crisis मानसिक आरोग्याची समस्या भविष्यात उद्भवणारे संकट नसून, ती जगभरात सध्या गंभीर स्वरूप धारण करत असल्याचे एका जागतिक सर्वेक्षणातून समोर आले आहे. विशेषत: तरुणांमध्ये मानसिक स्वास्थ्याची पातळी घसरत असून, पूर्वीच्या पिढ्यांच्या तुलनेत त्यांच्यातील सकारात्मक मानसिक गुणधर्म कमी झाल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. तरुणांमधील ही स्थिती केवळ वैयक्तिक समस्या नसून, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीशीही संबंधित असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
‘सोशल इंडिकेटर्स रिसर्च’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात ९२ देशांतील सुमारे ५० हजार लोकांचा सहभाग होता. २६१ संशोधकांच्या पथकाने हा अभ्यास केला. सर्वेक्षणात सहभागी नागरिकांना मानसिक आरोग्याशी संबंधित १० प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये स्वत:च्या क्षमतेवरील विश्वास, आशावाद, आत्मसन्मान, सकारात्मक भावना, कामातील सहभाग, उत्साह आणि भावनिक स्थैर्य यांचा समावेश होता. याशिवाय तणाव, नैराश्य, चिंता आणि जीवनातील एकूण समाधान यांचाही आढावा घेण्यात आला. वय, लिंग, आर्थिक स्थिती आणि रोजगारासंबंधी माहितीही गोळा करण्यात आली. Youth Mental Health Crisis
तरुणांमध्ये ऊर्जा आणि भावनिक स्थैर्याचा अभाव
अभ्यासानुसार, तरुणांमध्ये जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता, भावनिक स्थैर्य आणि उत्साह कमी असल्याचे दिसून आले. विशेषत: मानसिक तणावातून सावरण्याची क्षमता आणि सकारात्मक दृष्टिकोन याबाबत त्यांची कामगिरी चिंताजनक आहे. याउलट, वयस्कर व्यक्तींमध्ये मानसिक स्वास्थ्याचे चित्र तुलनेने सकारात्मक असल्याचे संशोधकांना आढळले. Youth Mental Health Crisis
नातेसंबंध, आयुष्यातील अर्थ, स्वत:च्या क्षमतेची जाणीव, कामातील सहभाग आणि आत्मसन्मान या बाबींमध्ये सर्वेक्षणातील सहभागींचे गुण तुलनेने चांगले होते. यावरून लोकांना स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याबद्दल समाधान असले, तरी बाह्य परिस्थितीमुळे त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली.Youth Mental Health Crisis
आर्थिक अस्थिरता आणि एआयमुळे वाढते आव्हान
अभ्यासाचे प्रमुख संशोधक आणि कोलंबिया विद्यापीठातील आरोग्य धोरण व व्यवस्थापन विभागाचे प्राध्यापक काई रग्गेरी यांनी तरुणांमधील परिस्थितीला धोक्याचा इशारा म्हटले आहे. राजकीय आणि आर्थिक अस्थिरता, भविष्याबद्दलची अनिश्चितता, रोजगाराची चिंता आणि कामाचा वाढता ताण यामुळे भीती, तणाव आणि मानसिक थकवा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
काय करायला हवे?
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगाराच्या संधींवर होणारे संभाव्य परिणाम, तरुण आणि नोकरदारांमधील कामाचा ताण तसेच मानसिक आरोग्यसेवांची अपुरी उपलब्धता यावर सरकारांनी ठोस उपाययोजना कराव्यात, असे संशोधकांचे मत आहे. केवळ सर्वसाधारण मानसिक आरोग्य उपक्रम जाहीर न करता रोजगाराची सुरक्षितता, उपचारांची उपलब्धता आणि भविष्यातील संधींबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष कृती आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रश्न भविष्यातील नव्हे, तर वर्तमानातील गंभीर आव्हान असल्याचा इशाराही अभ्यासात देण्यात आला आहे. Youth Mental Health Crisis
Read About : Moderate Alcohol Consumption Health Risks – छटाक दारूही आरोग्यासाठी धोकादायक
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.