Ad Advertisement Ad Advertisement

Women Prefer Warmer Temperatures : महिलांना पुरुषांपेक्षा उबदार वातावरण का आवडते?

शास्त्रज्ञांनी शोधले महत्त्वाचे कारण! नसांमधील दोन तापमान संवेदकांची भूमिका स्पष्ट

लंडन : Women Prefer Warmer Temperatures महिलांना पुरुषांपेक्षा तुलनेने उबदार वातावरण आवडते, असे मानले जाते. घरातील एसीचे तापमान किती असावे, यावरूनही अनेकदा मतभेद होताना दिसतात. आता किंग्ज कॉलेज लंडनच्या संशोधकांनी या फरकामागील संभाव्य जैविक कारण शोधले आहे. उंदरांवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, नसांमधील तापमान ओळखणारे दोन विशेष संवेदक यासाठी जबाबदार असू शकतात. हे संशोधन ‘द जर्नल ऑफ फिजिऑलॉजी’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

संशोधकांच्या मते, टीआरपीएम-२ हा संवेदक सौम्य उष्णता ओळखतो, तर टीआरपीएम-८ थंडावा जाणवण्यास मदत करतो. मादी उंदरांमध्ये हे दोन्ही संवेदक नर उंदरांच्या तुलनेत अधिक उष्ण तापमानात सक्रिय होतात. त्यामुळे समान तापमान मादी उंदरांना आरामदायक, तर नरांना अस्वस्थ करणारे वाटू शकते. Women Prefer Warmer Temperatures

प्रयोगातून काय आढळले?

संशोधकांनी उंदरांसमोर दोन धातूच्या उबदार प्लेट्स ठेवल्या. त्यापैकी एका प्लेटचे तापमान ३३ अंश सेल्सिअस स्थिर ठेवले, तर दुसऱ्याचे तापमान बदलले. नर उंदरांनी ३८ अंश तापमानाची प्लेट टाळली, तर मादी उंदरांनी तिला अधिक पसंती दिली. मादी उंदरांना साधारण ३६ अंश, तर नरांना ३२ अंश तापमानाचा पृष्ठभाग अधिक आवडला. Women Prefer Warmer Temperatures

टेस्टोस्टेरॉनचाही प्रभाव

नर उंदरांमधील टेस्टोस्टेरॉन कमी केल्यावर त्यांची उबदार तापमानाची पसंती वाढली. मादींमध्ये टेस्टोस्टेरॉन वाढवल्यावर त्यांनी उष्णता टाळण्यास सुरुवात केली. मात्र, हार्मोन्समुळे हा संपूर्ण फरक स्पष्ट होत नाही. शरीराचे तापमानही दोन्ही गटांत समान होते.

माणसांमध्येही अशीच यंत्रणा असण्याची शक्यता

प्रमुख संशोधक प्रा. पीटर मॅकनॉटन यांच्या मते, माणसांमध्येही हे दोन्ही संवेदक आढळतात. महिलांना साधारण २५ अंश, तर पुरुषांना २२ अंश सेल्सिअस खोलीचे तापमान अधिक सोयीचे वाटते. मात्र, हा अभ्यास उंदरांवर झाला असून, माणसांमध्येही हीच यंत्रणा कार्यरत आहे का, यासाठी स्वतंत्र संशोधन आवश्यक आहे.

Read About : Antarctica Glacier Melting : नासाच्या उपग्रह छायाचित्रांत दिसली कवटीसारखी रचना
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.