Ad Advertisement Ad Advertisement

Gunthewari Certificates in Sambhajinagar – 10 हजार नागरिकांना गुंठेवारी प्रमाणपत्रांची प्रतीक्षा

दोन उपअभियंते, ५ कनिष्ठ अभियंत्यांवर भार : १८ हजार फाइल्स दाखल

Gunthewari Certificates in Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : गुंठेवारी कायद्यान्वये शहरातील अनधिकृत भूखंड व बांधीव घर नियमित करून घेण्यासाठी महापालिकेने दिलेली सवलत १ नोव्हेंबरपासून बंद झाली आहे. दिलेल्या कालावधीत शहरातील तब्बल १८ हजार नागरिकांनी फाइल्स दाखल केल्या आहेत. यातील केवळ ८ हजार नागरिकांना गुंठेवारी प्रमाणपत्र देण्यात आले आहे, तर आता आम्हाला प्रमाणपत्र कधी मिळेल, हा प्रश्न घेऊन उर्वरित १० हजार नागरिक महापालिकेच्या चकरा मारत आहेत.

विशेष म्हणजे या कामासाठी महापालिकेने २ उपअभियंते, ५ कनिष्ठ अभियंत्यांची ‘फौज’ नियुक्त केलेली असून, होणाऱ्या टोलवाटोलवीमुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. अनेकजण प्रमाणपत्र कधी मिळणार, अशी विचारणा करण्यासाठी आता महापौरांसह पदाधिकाऱ्यांकडे धाव घेत आहेत.

बेटरमेंट चार्जेसवर ५० टक्के सूट

महापालिकेत पदभार घेतल्यानंतर महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद यांच्यासह नगरसेवकांनी गुंठेवारी शुल्कात सवलत देण्याची मागणी उचलून धरली. महापौरांच्या सूचनेनंतर आयुक्त अमोल येडगे यांनी प्रशासनामार्फत भूखंडाच्या बेटरमेंट चार्जेसवर ५० टक्के सूट, तर बांधीव घरासाठी ॲन्सलरीत १० टक्के आणि साइड मार्जिन न सोडल्याचा १० टक्के असे एकूण २० टक्के दंड माफ करण्याचा प्रस्ताव सादर केला.

महापालिकेने दिलेल्या सवलतीचा लाभ घेत शहरातील नागरिकांनी पोटाला चिमटा देत गुंठेवारी शुल्काची रक्कम भरली आहे. या नागरिकांना गुंठेवारीचे प्रमाणपत्र देणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. याचे भान ठेवून प्रस्ताव दाखल केलेल्या नागरिकांना गुंठेवारीचे प्रमाणपत्र वितरीत करण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. हे काम महिन्याभरात होईल, त्यादृष्टिने नियोजन करण्यात आले आहे.
– समीर राजूरकर, महापौर.

Read About: Ramayana Movie 2026 – ‘रामायण’ची भुरळ रश्मिका-विजयलाही, रणबीर, साई अन यशचे कौतुक

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.