पाली जिल्ह्यातील फालना शहरात मध्यरात्री भीषण दुर्घटना; सहा तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण
जयपूर : Rajasthan Firecracker Shop Fire राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील फालना शहरात फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत काँग्रेस नगरसेविका आणि त्यांच्या पतीचा होरपळून मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या उत्साहात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नगरसेविका उषा पूनमिया (खुडाला-फालना नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक २३ च्या प्रतिनिधी) आणि त्यांचे पती प्रकाश पूनमिया अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.या आगीत गौतम चंद पूनमिया नावाचे गृहस्थ गंभीररित्या भाजले असून, त्यांना पुढील उपचारासाठी जोधपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटना कधी आणि कुठे घडली?
फालना शहराच्या मुख्य चौकातील सुवर्ण मंदिराशेजारी असलेल्या एका फटाक्यांच्या दुकानात रात्री ११ च्या सुमारास ही आग लागली. फटाक्यांमुळे आगीने रौद्ररूप धारण केले आणि ती शेजारील किराणा तसेच बॅटरीच्या दुकानांमध्ये वेगाने पसरली.
६ तासांचे शर्थीचे प्रयत्न
आगीचे भीषण स्वरूप पाहून फालना, खुडाला, बाली आणि सुमेरपूर येथून अग्निशामक दलाच्या ५ गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. सुमारे ६ तास चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी ५ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
बचावकार्य आणि हानी
बचावकार्यादरम्यान उषा पूनमिया यांचा मृतदेह दुकानाच्या तळघरातून बाहेर काढण्यात आला. सुरक्षिततेचा उपाय म्हणून संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या आगीत अनेक दुकाने जळून खाक झाल्यामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
Read About: Ashti truck accident – 500 फूट खोल दरीत कोसळलेल्या ट्रकने घेतला पेट; चालकाचा दुर्देवी अंत
E-Paper: Punyanagari E-Paperअँक्सिडेंट


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.