Ad Advertisement Ad Advertisement

Mayor Trophy One Act Play Competition – मनपातर्फे ‘महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे’ आयोजन

२६, २७ डिसेंबर रोजी होणार स्पर्धा : २० वर्षांपासून बंद असलेली परंपरा पुन्हा सुरू

छत्रपती संभाजीनगर : Mayor Trophy One Act Play Competition : गेल्या वीस वर्षांपासून बंद पडलेली ‘महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा’ यंदापासून पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, राज्यातील नवोदित व हौशी नाट्यकलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी येत्या २६ व २७ डिसेंबर २०२६ रोजी संत एकनाथ रंगमंदिर नाट्यगृह येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना विविध गटात एकूण ४ लाख १० हजार रुपयांची भरघोस पारितोषिके दिली जाणार आहे, अशी माहिती महापौर समीर राजूरकर यांनी शुक्रवारी (दि.१३) पत्रकार परिषदेत दिली.

महापौर राजूरकर यांनी या स्पर्धेच्या आयोजनाची घोषणा केली, यावेळी पत्रकार परिषदेला उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभापती अनिल मकरिये, सभागृह नेते गोविंद केंद्रे, विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजीद, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे आदींची उपस्थिती होती. राजूरकर म्हणाले की, उद्यापासून या स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरू होणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १ लाख रुपये, द्वितीय ७५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास ५० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जणार आहे. याशिवाय प्रत्येकी २५ हजार रुपयांची दोन उत्तेजनार्थ पारितोषिके, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येईल. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, लेखन, पुरुष अभिनय, महिला अभिनय, संगीत, नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा व वेशभूषा या ९ कलाप्रकारांसाठी स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार आहे. यात प्रत्येक विभागासाठी प्रथम ७ हजार रुपये, द्वितीय ५ हजार रुपये व तृतीय ३ हजार रुपये व सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

राज्यातील सर्व नाट्यसंस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रति एकांकिका नोंदणी शुल्क १ हजार रुपये ठेवण्यात आले असून, १६ डिसेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. राज्यातील सर्व नाट्यसंस्था, महाविद्यालयीन नाट्यगट, हौशी व व्यावसायिक कलाकारांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी मनपा पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.

Read About : Bengaluru Seven Murders- कौटुंबिक वादातून कॅब चालकाने पत्नीसह 7 जणांना संपवले
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.