Ad Advertisement Ad Advertisement

Rahul Gandhi Phone Tapping Allegations – मोदींकडून माझे फोन टॅपिंग – राहुल गांधी

खुली चर्चा करण्याचे पुन्हा आव्हान

नवी दिल्ली : Rahul Gandhi Phone Tapping Allegations पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आपला फोन टॅपिंग केल्या जात आहे, असा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. तसेच विदेशी शक्तीच्या नियंत्रणात कोण वावरत आहे आणि देशविरोधी कारवायांमध्ये कोण गुंतले आहे? या मुद्द्यांवर त्यांनी पुन्हा एकदा मोदींना थेट आमनेसामने खुली चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे.

काँग्रेसने सोशल मीडिया ‘एक्स’वर टाकलेल्या एका व्हिडिओत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. आपल्याकडून केल्या जात असलेल्या आरोपांचे सर्व पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत. मोदींना या सर्व गोष्टींची पूर्ण जाणीव आहे. कारण मोदींकडून माझ्या फोनचे टॅपिंग केले जात आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच मोदींना पुन्हा एकदा समोरासमोर चर्चेला येण्याचे थेट आव्हान दिले. ज्या दिवशी मोदी चर्चेसाठी तयार होतील, त्या दिवशी सत्य देशासमोर येईल. विदेशी शक्तींच्या नियंत्रणाखाली कोण आहे? कोण देशविरोधी आहे? आणि हे सर्व प्रकार कधीपासून सुरू आहेत? या सर्व प्रश्नांनी उत्तरे चर्चेतून मिळतील, असे राहुल म्हणाले.

चर्चेसाठी संसदेत येण्याच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आव्हानावरही त्यांनी पलटवार केला. संसदेमध्ये आपल्याला बोलू दिले जात नाही. आपले मायक्रोफोन अनेक वेळा बंद करण्यात आले. शेतकरीविरोधी कायदे, मतचोरी, एसआयआर, चीनची घुसखोरी, माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे पुस्तकातील दावे आणि एपिस्टनसारख्या मुद्द्यांवर मी संसदेत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्याला संधी देण्यात आली नाही. त्यामुळे पंतप्रधानांसोबत सार्वजनिक व्यासपीठावर चर्चा हवी असल्याचे राहुल म्हणाले. गेल्या १२ दिवसांत त्यांनी सातव्यांदा मोदींना खुल्या चर्चेचे आव्हान दिलेले आहे. राहुल गांधी यांनी यापूर्वी देखील आपले फोन टॅपिंग केले जात असल्याचे आरोप केले होते.

राहुल गांधींना ‘मोदी फोबिया’ने पछाडले; एकनाथ शिंदे यांची टीका

मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना सध्या ‘मोदी फोबिया’ने इतके पछाडले आहे की, त्यांना उठता-बसता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच दिसतात. स्वत:ची बुडती नाव वाचवण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी ते फोन टॅपिंगसारखे निराधार, कपोलकल्पित आणि बालिश आरोप करीत आहेत. अशा आरोपांमुळे राहुल गांधी स्वत:चेच हसे करून घेत आहेत, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांच्यावर फोन टॅपिंग केल्याचा आरोप केला. या आरोपांना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सोशल मीडियावरून टीका केली आहे.

उथळ पाण्याला खळखळाट फार

राहुल गांधी यांना पंतप्रधानांचे नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. आपल्या दाव्यांच्या पुष्ठ्यर्थ एकही पुरावा नसताना गांधी पोकळ बाता मारत आहेत. दररोज नवा ‘फेक नरेटिव्ह’ रचायचा, हाच राहुल गांधी यांचा आता ‘फुलटाइम’ उद्योग झाला आहे, अशी टीका शिंदे यांनी केली. तसेच, एकीकडे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीची नवी शिखरे गाठत असताना, दुसरीकडे विरोधी पक्षनेते मात्र अशा हास्यास्पद विधानांमुळे स्वत:चेच हसे करून घेत आहेत. ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ ही म्हण राहुल गांधी यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

Read About : NCP Merger Talks – अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाचा विषय संपला!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.