Ad Advertisement Ad Advertisement

Travels Bus Accident – भरधाव ट्रॅव्हल्स पुलाच्या कठड्याला धडकून कोसळली नाल्यात

क्लिनरचा जागीच मृत्यू, २५ जण जखमी, एकजण गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर : Travels Bus Accident – पुण्यावहून नागपूरला जाणारी झिंगबस कंपनीची ट्रॅव्हल्स केंब्रीज चौकातील पुलाच्या कठड्याला धकडून १५ फूट खोल नाल्यात कोसळल्याची घटना शनिवारी पहाटे ४ वाजता घडली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्सचा क्लिनर जागीच ठार झाला असून २५ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमीतील एकाचा प्रकृती गंभीर असून त्याच्यावर घाटीच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झींगबस कंपनीची (एमएच ४३ सीके ०८००) पुणे-नागपूर जाणारी ट्रॅव्हल्स शुक्रवारी रात्री ९ वाजता निगडीहून निघाली. या ट्रॅव्हल्समध्ये २६ प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स पहाटे पाऊने चार वाजता छत्रपती संभाजीनगरात पोचोहली. छत्रपती संभाजीनगरहून ती नागपूरकडे निघाली असता चार वाजेच्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले आणि केंब्रीज चौकातील पुलाच्या कठड्याला अचानक धडकली. ट्रॅव्हल्स वेग प्रचंड असल्याने पुलाचा संरक्षक कठडा तोडून १५ फूट खाली नाल्यात कोसळली.

चार वाजेच्या सुमारास बहुतांश प्रवाशी झोपत होते. अचानक ट्रॅव्हल्स खड्यात पडल्याने झोपेत असलेले प्रवशी आपल्या जागेवरून खाली कोसळले. एकमेकांच्या अंगावर पडल्याने काहीजण दबल्या गेले तर काहींना ट्रॅव्हल्समधील कपार्टमेंटचा मार लागला. जखमी प्रवाशांमध्ये एकच हाहाकार माजला आणि ते बसमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करू लागले. पहाटेच्या शांततेत झालेल्या या मोठ्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ट्रॅव्हल्सच्या काचा फोडून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. अपघाताची माहिती डायल ११२ आणि चिकलठाणा पोलिसांनाही देण्यात आली. हा अपघात चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपती संभाजीनगर-जालना रोडवरील फत्तेपुर शिवारात घडल्याने चिकलठाणा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली.

पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने ट्रॅव्हल्समधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून तात्काळ उपचारासाठी मिनी घाटी आणि घाटीकडे रवाना केले. ट्रॅव्हल्समध्ये १४ पुरुष, ९ महिला आणि २ लहान मुले असे २६ प्रवासी होते. त्यापैकी क्लिनगर असलेल्या साई पाटील या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर आदित्य कोंढारकर गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर घाटीतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर इतर जखमींना घाटी आणि मिनी घाटीत दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघात प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

काहीकाळ वाहतुकीची कोंडी

छत्रपती संभाजीनगर-जालना हा मुख्य रहदारीचा मार्ग असल्याने अपघातस्थळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरू करून वाहनांना पर्यायी मार्गाने वळवले. दोन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स नाल्यातून बाहेर काढण्यात आली. विशेष म्हणजे, पोलिसांनी स्वत: रस्त्यावर उतरून विखुरलेला कचरा आणि तुटलेल्या कठड्याचा मलबा बाजूला केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

जखमींमध्ये यांचा समावेश

१) समीर माधवे (२३), २) अभिजीत इंगोले (२९), ३) उमेश रंगनाथ इंगोले (४१ रा. अमरावती), ४) आरव सोनू लोखंडे (९ रा. नागपूर), ५) पायल लोखंडे (२० रा. नागपूर), ६) राजकन्या चरणदास (५२ रा. अमरावती), ७) नेहल सुनिल वाशिक (२८ रा. निगडी पुणे), ८) इशिका कोणीकर (२३), ९) आदित्य कोंढारकर (३१, नागपूर), १०) अनिशा लिखार (२४) ११) पुष्पा बाबर (६२, पुणे), १२) दिक्षीता बनसोडे (२७), १३) राहूल यादव (२६), १४) सुरेश मिरासदर (२५), १५) जावेज डोबाले (३०), १६) चेतन प्रकाश ठाकरे (३२ रा. बोरगाव अमरावती), १७) श्यामल श्यामसुंदर राऊत (२७ रा. बोरगाव अमरावती), १८) सक्षम ठाकरे (२), १९) पवन विलास बरगे (२६ रा. फलटण), २०) शारू मुन (२८), २१) श्रुतिक गौतम वानखेडे (३०, रा. नागपूर) २२) योगेश सुभानराव देशमुख (३३ रा. अमरावती), २३) सोनी जयदिप कांबळे (२५, रा. पुणे) २४) रोहन वसंतराव दळवे (२६ रा. मुखड अमरावती), २५) सागर गंगाधर सपटे (३९, रा.अमरावती), २६) जगन राजू थोरात (४० रा. अमरावती) यांचा समावेश आहे.

Read About : Global M&A – जागतिक विलीनीकरण – खरेदी व्यवहारांना मोठा फटका; तिसऱ्या तिमाहीत व्यवहारमूल्य 36.9 टक्क्यांनी घटले
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.