Ad Advertisement Ad Advertisement

BNS Section 299 Religious Sentiments – केवळ अपमानास्पद वक्तव्ये हा धर्म दुखावण्याचा गुन्हा होत नाही

हायकोर्ट म्हणते त्यासाठी हेतूत: दुर्भावना हवी

छत्रपती संभाजीनगर : BNS Section 299 Religious Sentiments तोंडी किंवा लेखी स्वरूपात केलेल्या प्रत्येक अपमानास्पद अथवा अक्षेपार्ह वक्तव्याने भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ अन्वये धर्माचा किंवा धार्मिक भावनांचा अपमान करण्याचा गुन्हा होतोच असे नाही. या गुन्ह्यासाठी अशी वक्तव्ये एखाद्या ठरावीक समाजवर्गाच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी हेतूपुरस्सर दुर्भावनेने केलेली असायला हवीत, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे.
विनोद नारायण पाटील यांनी केलेल्या फिर्यादीवरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात २१ फेब्रुवारी रोजी मोहम्मद हिशाम उस्मानी मोहम्मद युसुफ उस्मानी यांच्याविरुद्ध कलम २९९ अन्वये गुन्हा नोंदवला गेला. त्याविरुद्ध उस्मानी यांनी केलेली याचिका मंजूर करून तो गुन्हा व त्याअनुषंगाने सुरू केलेली फौजदारी कारवाई रद्द करण्याचा निकाल देताना न्या. सुशील एम. घोडेस्वार यांनी वरील मत नोंदवले.

अशी होती पोस्ट…

उस्मानी यांनी फेसबुकवर टाकलेल्या ज्या हिंदी पोस्टमुळे त्यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंदवला होता ती पोस्ट अशी होती, ‘जिन शेरों को राज करना था, वो शान से राज करके चले गए. उनके सैकडों साल बाद भी कुछ गधे उनके महल में जाकर आज भी मुजरा करते हैं. साथही गधों के कुछ चपरासी भी रील बनाने और पानी भरने पहुंच जाते हैं. ना जाने शहंशाहने ऐसी कौन-सी जगह इंजेक्शन लगाकर नचवाया था, जो सैकडों साल बाद भी आजतक मुजरा करने वही जाते है. जाओ भय्या नाच लो. हो सकता है इससे तुम्हारा दर्द कम हो जाए. वैसे भी तुम्हारे बॉस के मुजरे की चर्चा इस्राईल और अमरिका तक हैं’.

काय म्हटले न्यायमूर्तींनी…

वरील पोस्ट जशीच्या तशी उद्धृत करून न्यायमूर्तींनी म्हटले की, ‘हे लिखाण जसे आहे तसेच वाचले तरी त्यातून कोणत्याही ठरावीक समाजवर्गाच्या धर्माचा किंवा त्यांच्या धार्मिक भावनांचा त्यातून कोणत्याही प्रकारे अपमान केल्याचे दिसत नाही.’

Read About : PAN Card and Voter ID Citizenship Proof – केवळ पॅन व मतदार ओळखपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.