चंद्रावर मानवी वस्ती उभारण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा
वॉशिंग्टन : Mylar Plastic Insulation – चंद्रावर भविष्यात मानवी वस्ती उभारण्याच्या प्रयत्नांना आता एका साध्या दिसणाऱ्या प्लास्टिकमुळे नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील पेनसल्व्हिेनिया वद्यिापीठातील संशोधकांनी आपत्कालीन ब्लँकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या मायलर प्लास्टिकपासून मजबूत आणि हलके इन्सुलेशन तयार केले आहे. चंद्रावरील अत्यंत थंडी आणि उष्णतेपासून अंतराळवीर तसेच उपकरणांचे संरक्षण करण्यासाठी या साहत्यिाचा उपयोग होऊ शकतो.
चंद्रावर तापमानात मोठा फरक असतो. काही भागात तापमान प्रचंड वाढते, तर काही भागात ते शून्याच्या अनेक अंश खाली जाते. अशा परस्थितिीत चंद्रावरील निवासस्थाने उबदार ठेवण्यासाठी चांगल्या इन्सुलेशनची गरज असते. मात्र इन्सुलेशन फक्त उष्णता रोखणारे असून चालत नाही. ते रॉकेटमधून चंद्रावर नेताना, बसवताना आणि नंतरच्या वापरात दाब आणि धक्के सहन करणारे असावे लागते.
प्रचंड दाबानंतरही गुणधर्म टिकून राहिले
संशोधकांनी मायलरच्या शेकडो अतिशय पातळ थरांना एकावर एक रचून हायब्रिड लेयर्ड इन्सुलेटिंग फिल्म स्टॅक्स तयार केले. मायलर हा हलका प्लास्टिक प्रकार आहे. त्यावर अॅल्युमिनियमचा थर दिल्यास तो उष्णतेचे किरण परावर्तित करतो. त्यामुळे उष्णता बाहेर जाण्याचे प्रमाण कमी होते. प्रयोगात या थरांनी सुमारे २० मेगापास्कल दाब सहन केला. बोटाच्या टोकाएवढ्या जागेवर सुमारे २०० पौंड वजन ठेवल्यास एवढा दाब निर्माण होतो. संशोधकांनी हा दाब दहा वेळा दिला, तरीही साहित्याचे इन्सुलेशन गुणधर्म टिकून राहिले.
भविष्यात इन्सुलेशन अधिक प्रभावी करता येणार
या साहित्यात उष्णता कशी प्रवास करते, याबाबतही महत्त्वाचे निरीक्षण झाले. प्लास्टिकच्या थरांमधील सूक्ष्म कण जिथे एकमेकांना टेकतात, तिथूनच बहुतेक उष्णता पुढे जाते. त्यामुळे भविष्यात या कणांची मांडणी बदलून इन्सुलेशन अधिक प्रभावी करता येऊ शकते.
अजून अनेक आव्हाने
सध्या हे नमुने फक्त सुमारे एक चौरस सेंटीमीटर आकाराचे आहेत आणि ते हाताने तयार करावे लागतात. चंद्रावरील मोठ्या निवाऱ्यांसाठी मोठ्या आकाराच्या चादरी तयार करण्याची पद्धत विकसित करावी लागेल. तसेच वारंवार वाकवणे, धक्के आणि ओरखडे यांत हे साहत्यि किती टिकते, याची तपासणी अजून बाकी आहे. ही आव्हाने पार झाली तर हे हलके आणि वाकणारे इन्सुलेशन चंद्रावरील घरे, रोव्हर, अंतराळ पोशाख आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी उपयुक्त ठरू शकते.
Read About : China Moon Landing 2030 : 2027 पासून चाचण्या, 2030 मध्ये दोन अंतराळवीर चंद्रावर उतरणार
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.